Breking News
Drought Relief 2026 Maharashtra : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ४ हजार ३७२ कोटींची दिवाळी अग्रीम मदत- मंत्री मकरंद जाधव पाटीलPune Private Bus Fare : खासगी प्रवासी बसेसकडून जादा भाडे आकारणी केल्यास कठोर कारवाईPune Soldier Welfare Scheme : माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना १० लाख २५ हजारांचे वितरणPune MCOCA Action : पुण्यात गोळीबार करुन लुटमार; उत्तर प्रदेशातील दरोडेखाेरांविरुद्ध मोक्का’Pune Fodder Management Plan : पुणे जिल्ह्याचे असे नियोजन ; चारा टंचाईवर होईल मात – विशेष लेखPune Crop Insurance Scheme : पीक व फळपीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवा; व्यापक जनजागृती करा – वैभव तांबेPune MD Drug Seizure : पुण्यात मेफेड्रोन ड्रग्जविरोधात मोठी कारवाईPune House Burglary News : पुण्यात तीन ठिकाणी घरफोड्या; दागिने, रोकड लंपासPune Cyber Crime News : रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्याच्या बहाण्याने दोघांना १७ लाखांचा गंडाSkill Development for Youth : कौशल्यसंपन्न युवा पिढी घडविणे हीच विकसित देशाची खरी गुरुकिल्ली- डॉ. विजय भटकर

पुण्यातील तुळशीबागेत महिलेच्या पिशवीतून ६ लाखांचे दागिने चोरीला

तुळशीबागेत महिलेचे दीड लाखांचे दागिने चोरी

चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून ६ लाख २७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिबवेवाडी, कोंढव्यात घरफोडी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३९ वर्षीय महिला वाघोली भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. १९ एप्रिल रोजी सायंकाळी त्या तुळशीबागेत नातेवाईकांसोबत खरेदीसाठी आल्या होत्या. अक्षय्य तृतीया असल्याने त्यांनी सराफी पेढीतून दागिने खरेदी केले होते. दागिने एका छोट्या खोक्यात ठेवण्यात आले होते. हे खोके त्यांनी पिशवीत (पर्स) ठेवले होते. अक्षय तृतीया असल्याने तुळशीबागेत खरेदीसाठी गर्दी होती. तुळशीबागेतील बँक ऑफ महाराष्ट्राच्या गल्लीत चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतून दागिने ठेवलेले खोके चोरून नेले. महिला घरी पोहोचल्यानंतर पिशवीतून दागिने ठेवलेले खोके चोरून नेल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी ६ लाख २७ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. महिलेने नुकतीच पोलिसांकडे फिर्याद दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर तपास करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून तुळशीबागेत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यापार्श्वभूमीवर तुळशीबागेत पोलिसांनी गस्त वाढवावी. महिलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तुळशीबाग व्यापाारी असोसिएशनचे पदाधिकारी, तसेच छोटे व्यावसायिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच केली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×