Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

पुण्यात महिलेला चांगल्या परताव्याचे आमिष पडले सव्वा दोन कोटींना

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची फसवणूक

सायबर चोरट्यांचा गंडा

marathinews24.com

पुणे – सायबर चोरट्यांनी पुणेकरांना वेठीस धरले असून, विविध आमिष दाखवून ऑनलाईनरित्या गंडा घातला जात आहे. याप्रकरणी सातत्याने जनजागृती करूनही नागरिकांमधील हव्यास कमी होत नसल्यामुळे फसवणूकीच्या घटनांचा आलेख वाढत चालला आहे. विशेषतः उच्च शिक्षितही सायबर चोरट्यांच्या आमिषाला बळी पडत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संबंधित सायबर चोरट्यांच्या बतावणीला बळी न पडण्याचे आवाहन पुणे सायबर पोलिसांनी केले आहे.

पुण्यातील तुळशीबागेत महिलेच्या पिशवीतून ६ लाखांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी

शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी शेवाळेवाडी परिसरात राहणार्‍या ३६ वर्षीय महिलेला तब्बल २ कोटी ३० लाख १५ हजारांचा गंडा घातला आहे. ही घटना २६ जानेवारी ते ११ मार्च २०२६ कालावधीत घडली आहे. याप्रकरणी महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, बँकखातेधारक यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला शेवाळेवाडीत राहायला असून, २६ जानेवारीला सायबर चोरट्याने त्यांना संपर्क केला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी केली. विश्वास संपादित केल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले अवघ्या दोन महिन्यांत सायबर चोरट्यांनी महिलेकडून २ कोटी ३० लाखांची रक्कम वर्ग करून घेतली. मात्र, त्यांना परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करीत आहेत.

जेष्ठ महिलेची १ कोटींची सायबर फसवणूक

शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्यांनी ६६ वर्षीय महिलेला तब्बल १ कोटींचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १४ डिसेंबर २०२५ ते १९ फेबु्रवारी २०२६ कालावधीत वानवडीत घडली आहे. याप्रकरणी महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला वानवडी परिसरात राहायला असून, १४ डिसेंबरला सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. शेअर मार्कटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, अशी बतावणी केली. त्यानंतर सायबर चोरट्यांनी महिलेचा विश्वास संपादित केल्यानंतर गुंतवणूकीला सुरूवात केली. अवघ्या काही दिवसांत महिलेने तब्बल १ कोटी रूपये संबंधिताच्या बँकखात्यात पाठवून दिले. मात्र, काही दिवसानंतरही त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जेष्ठ महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×