Breking News
‘भारताची भीमज्योत’ बाबासाहेबांचे संविधान मजबूत करणारीवृक्षसंवर्धन आणि फिटनेसचा संगम, प्रसारासाठी विशेष उपक्रमलोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा ‘… तर आपल्या पक्षाचा विस्तार वेगाने करणे हेच उद्दिष्ट’नवीन सोलर धोरण राज्यातील उद्योगांना मारकडेक्कन परिसरात टोळक्याची एकाला बेदम मारहाण, दातही पाडलेपुण्यात तरुणाचा खून करून पसार आरोपी सहा वर्षानंतर अटकेतशिवसेना महिला आघाडीच्या माध्यमातून महिलांपर्यंत योजना पोहोचवापुण्यातील बुधवार पेठेत पुन्हा कोम्बिंग ऑपरेशनअसोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या राष्ट्रीय कुलगुरू महासभेचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

पुण्यातील बुधवार पेठेत पुन्हा कोम्बिंग ऑपरेशन

पुण्यातील बुधवार पेठेत पुन्हा कोम्बिंग ऑपरेशन

१५ बांग्लादेशींसह १८ जण ताब्यात

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती बुधवार पेठेत पोलिसांनी पुन्हा एकदा कोम्बिंग ऑपरेशन राबवून बांग्लादेशींची धरपकड केली आहे. रात्री अकरा ते पहाटे तीन वाजेदरम्यान केलेल्या कारवाईत १५ बांग्लादेशींसह १८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. बांग्लादेशींमध्ये ११ महिला, ३ पुरूषांसह एका मुलाचा समावेश आहे. संबंधित सर्वजण बेकायदेशीररित्या हिंदुस्थानात वास्तव्य करीत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यांना कायदेशीर प्रक्रिया करून लवकरच डिपोर्ट केले जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी दिली आहे.

तरूणाच्या डोक्यात वार करून मनगट तोडले – सविस्तर बातमी 

बुधवार पेठेतील डिस्को आणि माचीस इमारतींमध्ये पोलीस पथकाने छापा टाकला. त्यावेळी घटनास्थळाहून १८ जणांना ताब्यात घेण्यात आले. विविध कागदपत्रांची तपासणी केली असता, त्यामध्ये ११ महिलांसह, तीन पुरूष आणि एक मुलगा बांग्लादेशी असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत संबंधित महिला विना परवानगीशिवाय हिंदुस्थानात बेकायदेशीररित्या राहत होत्या. ११ महिला वेश्या व्यवसासायाठी बुधवार पेठेतील दोन इमारतीत राहत असल्याचे उघडकीस आले आहे. कारवाईवेळी आरोपींकडून मोबाइल, हिशेबाच्या डायर्‍या, कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी मानवी तस्करी, अल्पवयीन मुलीचा वापर, परदेशी नागरिकांचे बेकायदेशीर वास्त्यव्य असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

बांग्लादेशीविरूद्ध यापुर्वीही कारवाईचा बडगा

मध्यभागात वेश्यावस्तीत राहणार्‍या अनेक बांग्लादेशी महिलांविरूद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून डिपोर्ट करण्यात आले आहे. मात्र, विनाकागदपत्रांशिवाय त्यांना हिंदुस्थानात आणणार्‍या एजंटाविरूद्ध कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बांग्लादेशी महिलांसह पुरूष कसे मिळून येत आहेत, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बेकायदेशीररित्या राहणार्‍या बांग्लादेशी नागरिकाविरूद्ध यापुर्वीही मोहिम हाती घेउन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा राबवलेल्या मोहिमेत दोन इमारतींत छापा टाकून १८ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी १५ जण बांग्लादेशी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याविरूद्ध कारवाई केली जात आहे.

कृषीकेश रावले, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×