पर्वती गावात दोघांवर शस्त्राने वार

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला अटक

marathinews24.com

पुणे – वैमनस्यातून दोन तरुणांवर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना पर्वती परिसरात घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसंनी एकाला अटक केली असून, साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओम सुधीर वैद्य (वय १९, रा. टिकेकर वाडा, पर्वती गाव), अथर्व सचिन चव्हाण (वय १९) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोहित अरुण चक्रनारायण (वय ३८, रा. लक्ष्मीनगर, पर्वती) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वैद्य याने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खाण्याच्या पानात भांगमिश्रीत नशेच्या गोळ्यांचा वापर – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्य आणि आरोपींमध्ये वाद झाले होते. २८ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास वैद्य आणि चव्हाण हे लक्ष्मीनगरमधील प्रेमळ विठ्ठल मंदिर परिसरात थांबले होते. त्या वेळी आरोपी चक्रनारायण आणि साथीदारांनी शिवीगाळ केली. वैद्य आणि चव्हाण यांच्यावर शस्त्राने वार करुन त्यांना बॅटने मारहाण केली. या प्रकरणात चक्रनारायण याच्याबरोबर असलेल्या एका महिलेसह अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×