Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

पुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरला

२६ नागरिकांना श्वसनाचा त्रास, मार्केटयार्डातील गंगाधाम चौकातील घटना

marathinews24.com

पुणे – क्लोरिनचा सिलेंडर निष्काळजीपणे ठेवल्यामुळे त्यात विषारी वायू तयार होउन गळती झाल्याची घटना गुरूवारी (दि.३०) मध्यरात्रीच्या सुमारास मार्वेâटयार्ड परिसरातील गंगाधाम रोड आईमाता मंदीरासमोरील बाजूस घडली आहे. टाकीतील क्लोरिन लिक्वीड बाहेर आल्यामुळे २६ नागरिकांना श्वसनाचा त्रास झाल्याची घटना घडली आहे. संबंधित सर्व नागरिकांना तातडीने रूग्णालयात दाखल केले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, याप्रकरणी बेजाबदारपणा आणि निष्काळजीपणा बाळगल्याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती बिबवेवाडी ठाण्याचे पोलीस अधिकारी अमोल माने यांनी दिली आहे.

आयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्न – सविस्तर बातमी

गंगाधाम रस्त्यावर आईमाता मंदिरासमोर पाण्याची टाकी असून, त्याठिकाणी दोघाजणांच्या मालकीची मोकळी जागा आहे. त्याठिकाणी पुणे महानगरपालिकेकडून पाणी शुद्ध करण्यासाठी लागणारे क्लोरिन लिक्वीड संबंधितांनी उघड्यावर साठवून ठेवले होते. त्याची काळजी न घेतल्यामुळे बंद असल्यामुळे लिक्वीडचा गॅस तयार झाले. त्यानंतर क्लोरिन सिलेंडरचा गॅस होउन पसरल्यामुळे आजूबाजूला असलेल्या २६ नागरिकांना श्वसनाचा त्रास होउ लागला. डोळे चुरचुरणे, श्वसनाचा त्रास जाणवल्याच्या तक्रारी करण्यात आला. गॅस गळतीची घटना समजल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. सुरक्षाविषयक उपकरणे परिधान (बीए सेट) करुन आधिकारी आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य राबविले. नागरिकांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले.

नागरिकांसह, अग्निशमक दलाच्या जवानांनाही त्रास

‘गॅस गळतीमुळे २६ नागरिकांना त्रास असून, अग्निशमन दलाचे एक अधिकारी आणि जवान यांनाही त्रास झाला. त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले आहे. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही’, अशी माहिती अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी दिली. अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ५ अधिकारी आणि ३० जवान मदतकार्यात सहभागी झाले होते.

क्लोरिन लिक्वीडचा गॅस झाल्यानंतर परिसरात पसरला होता. त्यामुळे आजूबाजूच्या २६ नागरिकांना श्वसनाचा त्रास झाला आहे. संबंधितांना तातडीने रूग्णालयात दाखल केले असून, त्यांची प्रकृत्ती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान, याप्रकरणी आरोपींविरूद्ध बेजबाबदारपणा, निष्काळजपणाचा ठपका ठेउन गुन्हा दाखल केला आहे.

अमोल माने, पोलीस अधिकारी, बिबवेवाडी पोलीस ठाणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×