Breking News
पुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडले

सिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्या

सोसायटीतील घसरगुंडी पडून बालिकेचा मृत्यू

हवेली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

marathinews24.com

पुणे – सिंहगड किल्ला परिसरातील तूपखाना परिसरात बुरुजावरुन उडी मारुन एका तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

प्रेमप्रकरणातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय तरुणी चिंचवड परिसरातील बिजलीनगर भागात राहायला आहे. ती मूळची नांदेडची रहिवासी आहे. तरुणी २८ एप्रिल रोजी घरातून बेपत्ता झाली. तिच्या कुटुंबीयांनी याबाबतची तक्रार पोलिसांकडे दिली होती. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना याबाबतची माहिती देण्यात आली. तांत्रिक तपासात तरुणी सिंहगड किल्ला परिसरात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर हवेली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली पाटील, सहायक फौजदार गिरे, प्रवीण ताकवणे आणि पथकाने तरुणीचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी शोधमोहिमेत गिर्यारोहकांच्या पथकाची मदत घेतली. मध्यरात्रीपर्यंत तरुणीचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी पुन्हा शोधमोहीम राबविली.

तरुणीने सिंहगड किल्ला परिसरातील तूपखान्याजवळील बुरुजावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर गिर्यारोहक पथकातील कृष्णा मरगळे, तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संदीप सोलासकर, नारायण जावळकर, संजय चोरगे, उत्तम पिसाळ, संतोष भगत, वैभव भोसले यांनी कड्यावरुन दोर बांधून दरीत उतरले. दरीत तरुणीचा मृतदेह सापडला. तरुणीचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. वनविभागाचे अधिकारी समाधान पाटील, बळीराम वायकर, संदीप कोळी यांनी पथकाला सहकार्य केले. तरुणीच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×