Breking News
Pune Woman Police Assault : पुण्यात विसर्जन घाटावर महिला पोलिसाला नारळ फेकून मारला, दातच पाडलाShivraj More Voter List : मतदार याद्यांतील गोंधळाची चौकशी करा; ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्याChakan Hinjewadi Infrastructure Plan : चाकण-हिंजवडीतील वाहतूक व नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्यास तत्वतः मंजुरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसNeelam Gorhe Residence Case : डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्नDog Attack : कुत्र्याने घेतला १२ वर्षीय मुलाच्या चेहर्‍याचा चावाSugarcane Crushing Season 2026 : ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून; परवाना प्राप्त कारखान्यांना त्यापूर्वीही गाळपाची मुभाSeva Sankalp Abhiyan Indapur : इंदापूर तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहातPimpri Chinchwad Election Restrictions : विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये निर्बंध लागूपद्मश्री डॉ. कोल्हे दाम्पत्याकडून दुधभाते नेत्रालयाच्या आधुनिक नेत्रसेवेचे कौतुकPune Crime News : काळेपडळमध्ये गांजा विक्रेत्या सराईत टोळीचा पर्दाफाश

प्रेमप्रकरणातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरला

तरुणीची प्रकृती चिंताजनक

marathinews24.com

पुणे – प्रेमप्रकरणात झालेल्या वादातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरल्याची धक्कादायक घटना चंदननगर भागात घडली. तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. तरुणीवर खासगी रुग्णलायातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पुण्यात भरधाव कारची दोन विद्यार्थिनी धडक – सविस्तर बातमी

उजालादेवी जसवंतसिंग दोहरे (वय २२, सध्या रा. चंदननगर, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी दिलीप राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उजालादेवीचा मोठा भाऊ भगतसिंग (वय २५) याने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपीने केलेल्या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. सुरुवातीला तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश बडाख यांनी दिली.
आरोपी तरुण आणि उजालादेवी हे नगर रस्त्यावरील एका माॅलमध्ये काम करत होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू झाली. उजालादेवी ही चंदननगरमघील पठारे वस्ती भागात राहायला आहे. बुधवारी (२९ एप्रिल) आरोपी पठारे वस्ती भागात आला. तरुणी एकटीत घरात होती. तरुणीचा भाऊ भगतसिंग आणि त्याची पत्नी कामावार गेले होते. आरोपी उजालादेवीच्या घरात शिरला. त्याने तिच्याशी वाद घालून ब्लेडने गळा चिरला. आरोपीने केलेल्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत तिने भाऊ भगतसिंग याच्या मोबाइलवर संपर्क साधला. ‘तू लवकर घरी ये. मला एकाने मारले आहे’, असे तिने भावाला सांगितले. त्यानंतर भावाने तेथे धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश बडाख यांनी घटनास्थळी भेट दिली. तरुणीचा गळा चिरण्यात आल्यानंतर तिला बोलता येत नव्हते. पोलिसांनी तिला विचारणा केली. तेव्हा तरुणीने पेन आणि कागद देण्यास सांगितले. कागदावर तिने आरोपीचे नाव लिहिले. या घटनेनंतर चंदननगरमधील पठारे वस्ती घबराट उडाली. पसार झालेल्या आरोपीचा शोघ धेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे, असे पोलीस निरीक्षक बडाख यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×