Breking News
Pune Woman Police Assault : पुण्यात विसर्जन घाटावर महिला पोलिसाला नारळ फेकून मारला, दातच पाडलाShivraj More Voter List : मतदार याद्यांतील गोंधळाची चौकशी करा; ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्याChakan Hinjewadi Infrastructure Plan : चाकण-हिंजवडीतील वाहतूक व नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्यास तत्वतः मंजुरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसNeelam Gorhe Residence Case : डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्नDog Attack : कुत्र्याने घेतला १२ वर्षीय मुलाच्या चेहर्‍याचा चावाSugarcane Crushing Season 2026 : ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून; परवाना प्राप्त कारखान्यांना त्यापूर्वीही गाळपाची मुभाSeva Sankalp Abhiyan Indapur : इंदापूर तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहातPimpri Chinchwad Election Restrictions : विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये निर्बंध लागूपद्मश्री डॉ. कोल्हे दाम्पत्याकडून दुधभाते नेत्रालयाच्या आधुनिक नेत्रसेवेचे कौतुकPune Crime News : काळेपडळमध्ये गांजा विक्रेत्या सराईत टोळीचा पर्दाफाश

बाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यू

रिक्षा उलटून प्रवाशाचा मृत्यू; चार जण जखमी

नवीन कात्रज बोगद्याजवळ अपघात

marathinews24.com

पुणे – बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगद्याजवळ कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यू झाला. अपघातात मोटारीतील दोघे जण जखमी झाले. याप्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रघुनाथ मारुती घारे (वय ५५, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) असे मृत्यमुुखी पडलेल्या मोटारीतील प्रवाशाचे नाव आहे. अपघातात घारे यांचे नातेवाईक संजय चाळके, नात गाथा हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत मोटारचालक रोहित रघुनाथ घारे (वय २५, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटारचालक रोहित घारे, त्यांचे वडील रघुनाथ, वडिलांचे मामा संजय चाळके, तसेच भाची गाथा हे गुरुवारी (३० एप्रिल) दुपारी मोटारीतून मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन निघाले होते. त्या वेळी नवीन कात्रज बोगद्याजवळ भरधाव कंटेनरने अचानक मार्गिका बदलली. याबाबत सूचना दिली नाही. कंटेनरचालकाने ‘इंडिकेटर’ दाखविला नाही. कंटेनरच्या एका बाजूवर मोटार आदळली. मोटारीतील प्रवासी गंभीर जखम झाले. मोटार चालक रोहित यांना दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांनी अपघातग्रस्त मोटारीतील चौघांना बाहेर काढले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल झाले. गंभीर जखमी झालेले मोटारीतील प्रवासी रघुनाथ घारे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले. कंटनेर चालकाच्या चुकीमुळे अपघात झाल्याचे मोटार चालक रोहित घारे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण डोईफोडे तपास करत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×