Breking News
Pune Woman Police Assault : पुण्यात विसर्जन घाटावर महिला पोलिसाला नारळ फेकून मारला, दातच पाडलाShivraj More Voter List : मतदार याद्यांतील गोंधळाची चौकशी करा; ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्याChakan Hinjewadi Infrastructure Plan : चाकण-हिंजवडीतील वाहतूक व नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्यास तत्वतः मंजुरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसNeelam Gorhe Residence Case : डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्नDog Attack : कुत्र्याने घेतला १२ वर्षीय मुलाच्या चेहर्‍याचा चावाSugarcane Crushing Season 2026 : ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून; परवाना प्राप्त कारखान्यांना त्यापूर्वीही गाळपाची मुभाSeva Sankalp Abhiyan Indapur : इंदापूर तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहातPimpri Chinchwad Election Restrictions : विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये निर्बंध लागूपद्मश्री डॉ. कोल्हे दाम्पत्याकडून दुधभाते नेत्रालयाच्या आधुनिक नेत्रसेवेचे कौतुकPune Crime News : काळेपडळमध्ये गांजा विक्रेत्या सराईत टोळीचा पर्दाफाश

महापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभ

नागरिकांना सहभागाचे आवाहन

marathinews24.com

पुणे – जनगणना २०२७ या महत्त्वाच्या राष्ट्रीय उपक्रमाची महाराष्ट्रात आजपासून सुरुवात झाली असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी स्वतः ऑनलाइन स्वगणना पूर्ण करून या मोहिमेचा प्रारंभ केला. नागरिकांनीही पुढाकार घेत या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

बारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारी

महापौर रवि लांडगे यांनी https://se.census.gov.in या संकेतस्थळावर भेट देत आवश्यक माहिती भरून स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली. सर्व ३४ प्रश्नांची अचूक माहिती देत त्यांनी नोंदणी केली आणि ‘सेल्फ एन्युमरेशन आयडी’ प्राप्त केला. त्यांच्या या कृतीमुळे नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचला आहे.

महापौर लांडगे म्हणाले, जनगणना ही देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक आहे. अचूक माहितीमुळे शासनाला योग्य नियोजन करता येते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने या उपक्रमात सहभागी व्हावे. १ मे ते १५ मे २०२७ या कालावधीत स्वगणना सुविधा उपलब्ध असून नागरिकांना घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

याशिवाय, १६ मे ते १४ जून दरम्यान प्रगणकांमार्फत घरोघरी भेट देऊन उर्वरित जनगणना प्रक्रिया पार पडणार आहे. तरी अधिकाधिक नागरिकांनी स्वगणना करून सहकार्य करावे, असे आवाहन महापौर लांडगे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×