Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंढव्यातील एबीसी फार्म चौकात घडली. याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. स्वप्नील संतोष कदम (वय २२, रा. हिंगणे मळा, हडपसर) असे मृत्यूमुखी पडलेल्या दुाचकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संतोष मारुती कदम (वय ४७) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात चॉकलेटच्या आमिषाने चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार स्वप्नील हा २७ एप्रिल रोजी मुंढव्यातील एबीसी फार्म चौकातून निघाला होता. त्यावेळी भरधाव टेम्पोने दुचाकीस्वार स्वप्नील याला धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या स्वप्नीलचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक पोमण तपास करत आहेत.

पर्वती भागात ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

पुणे- पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ३ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना पर्वती परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७६ वर्षीय ज्येष्ठ महिला कोथरूड भागातील डहाणूकर काॅलनीत राहायला आहेत. त्या ५ मे रोजी रात्री दहाच्या सुमारास पर्वती परिसातून निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची कंठी माळ आणि मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केले. चोरटे पसार झाले. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलिसांनी पर्वती परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×