कोथरूडच्या रंगमंचावर नव्या स्वप्नांची ‘नांदी’

चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नात्यतीर्थ फाउंडेशनचे लोकार्पण

marathinews24.com

पुणे – शहरातील कोथरूडमधील घराघरांत दडलेल्या सुप्त कलागुणांना आता हक्काचं आकाश मिळणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून, केवळ हौशी आणि नवोदित कलाकारांसाठी ‘नाट्यतीर्थ फाउंडेशन’ या संस्थेचा श्रीगणेशा शुक्रवारी ( दि.८) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने कोथरूडच्या सांस्कृतिक वैभवात एका नव्या, संवेदनशील अध्यायाची भर पडली आहे. केवळ राजकारण आणि समाजकारण न थांबता, समाजातील कलाकारांच्या स्वप्नांना बळ देण्याच्या ध्येयातून ही संस्था उभी राहिली आहे.

लोकसंग्रह हीच वसंतराव मसके यांची श्रीमंती-चंद्रकांत पुलकुंडवार – सविस्तर बातमी

कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे नाट्यतीर्थ फाउंडेशनच्या कलाकारांनी सादर केलेले ‘रंगपूजा’ हे नाटक. रंगमंचावरचा तो प्रकाशझोत, कलाकारांच्या डोळ्यांतील ती चमक आणि संवादांतून ओसंडून वाहणारी ऊर्मी पाहून चंद्रकांत दादांसह उपस्थित रसिक भारावून गेले. नवोदित कलाकार असूनही त्यांनी सादर केलेल्या या प्रयोगाने व्यावसायिक नाटकांची तोड केली. ‘रंगपूजा’च्या या प्रयोगातूनच या संस्थेच्या भविष्यातील भव्यतेची आणि दर्जेदार कामाची चुणूक पाहायला मिळाली. संस्थेच्या शुभारंभप्रसंगी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “कला आणि कलाकार यांना लोकाश्रयासह राजाश्रयाची देखील गरज असते. त्यामुळेच कोथरुड मधील हौशी आणि नवोदित कलाकारांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून आंतर सोसायटी एकांकिका स्पर्धा आयोजित करत आहे. यामुळे अनेक हौशी कलाकारांना व्यासपीठ मिळाले. आता त्यांना नाटकाचे तंत्रशुद्ध शिक्षण मिळावे; यासाठी नाट्यतीर्थ संस्थेचा उपक्रम हाती घेतला आहे. ‘नाट्यतीर्थ फाउंडेशन’ हे केवळ नाव नसून, ती प्रत्येक कलाकाराची कर्मभूमी ठरेल.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘नाट्यतीर्थ फाऊंडेशनच्या रूपाने आता कोथरूडच्या मातीतील नव्या पिढीचे कलाकार केवळ नाटक शिकणार नाहीत, तर ते जगणार आहेत. आजच्या नाट्यप्रयोगाने खऱ्या अर्थाने कोथरूडच्या कलाविश्वात एका नव्या पर्वाचा ‘पडदा’ उघडला आहे. दरम्यान, ‘रंगपूजा’चा काळजाला भिडणारा प्रयोग पाहून चंद्रकांत दादा भारावलेच नाहीत, तर एका लोकप्रतिनिधीच्या आत दडलेला हळवा रसिक जागा झाला. दादांनी हातातील स्वतःचं मनगटी घड्याळ काढून दिग्दर्शक अथर्व भागवत याच्या हातावर बांधलं. ते केवळ घड्याळ नव्हतं, तर एका नवोदित कलाकार आणि दिग्दर्शकाच्या कष्टांना दिलेली अनमोल पावती होती. दादांच्या या उत्स्फूर्त दातृत्वाने उपस्थित प्रत्येक जण भारावून गेला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×