Breking News
निर्यातीच्या आमिषाने ४ कोटी ३२ लाखांची फसवणूकपुण्यात कौटुंबिक वादातून सुनेकडून सासूचा खूनप्रेमविवाह केल्याने तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वारस्वारगेट परिसरातील बेकायदा धंद्यांवर गुन्हे शाखेचा छापागुंतवणुकीवर परताव्याचे आमिष दाखवून जेष्ठाची फसवणूकऊसतोड कामगारांसाठीच्या कायद्याचा मसुदा संकेतस्थळावर प्रसिद्ध करा- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे‘प्रारंभ २०२६’ मोहिमेद्वारे अधिकाधिक करदात्यांपर्यंत पोहोचणारउष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमितभग्न दगडांपासून अखंड श्रद्धेपर्यंत:सोमनाथची गाथा-ब्रिजेश सिंहसायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची ६३ लाखांची फसवणूक

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक

पुण्यात १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यत आल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर परिसरातील म्हाताोबाची आळंदी गावात शनिवारी घडली. लवांडे यांना पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, तसेच त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. लवांडे यांच्यावर शाईफेकीची घटना उघडकीस आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांकडून १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी संग्राम भंडारे, अक्षय कांचन (रा. ऊरळी कांचन, ता. हवेली) यांच्यासह चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विकास लवांडे (वय ५४, रा. अष्टापूर, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सायबर चोरट्यांकडून महिलांची १३ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास लवांडे हे एका दशक्रिया विधीसाठी लोणी काळभोर परिसरातील म्हातोबाची आळंदी गावात आले होते. दशक्रिया विधी आटोपल्यानंतर ते सकाळी दहाच्या सुमारास निघाले. म्हातोबाची आळंदी गावातील स्मशानभुमीजवळ लवांडे यांना मोटारीत प्रवेश करताना आरोपींना अडवले. आरोपी दाेने वेगवेगळ्या मोटारीतून आले होते. त्यापैकी दोघांनी त्यांना पिस्तुलाचा धाक दाखविला. त्यांना मोटारीतून बाहेर खेचले. लवांडे यांच्या मोटारीवरील चालक संतोष गडदे यांना शिवीगाळ केली, असे लवांडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. आम्ही तुला जिवंत सोडणार नाही. दोन पिस्तुले आमच्याकडे आहेत. गोळीबार करुन तुला संपवून टाकू. आमच्या गुरुच्या अपमानाचा बदला घेणार आहोत’, अशी धमकी आरोपींनी दिल्याचे लवांडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डाॅ. सागर कवडे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी घटनास्थळी भेट दिली.

मी प्रवचनकार आहे. वारकरी संप्रदायाशी मी संबंधित आहे. वारकरी संप्रदायातील कथित घुसखोरांची नावे मी जाहीर केली होती. तेव्हापासून मला धमक्या येत होत्या. मी महाराष्ट्रभर फिरून प्रवचन करतो. बजरंग दल आणि गोरक्षकांकडून माझ्या जिवाला धोका आहे. पोलिसानी मला संरक्षण द्यावे. या प्रकरणातील आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही. तोपर्यंत मी आंदोलन करणार आहे’, असे लवांडे यांनी सांगितले.

लवांडे यांच्यावर शनिवारी सकाळी शाईफेक करण्यात आल्याची घटना घडली. आरोपींनी या घटनेची चित्रीकरण मोबाइलवरुन केले. संबंधित चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित करण्यात आली. आमच्या गुरुवर्यांबद्दल लवांडे यांनी आक्षेपार्ह विधान करण्यात आले. त्यांना घुसखोर, धर्मांध म्हटले. आमच्या गुरुवर्यांचा अपमान सहन करणार नाही, अशी चित्रफीत समाज माध्यमात या प्रकरणातील आराेपींनी प्रसारित केली.

‘याप्रकरणात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे’, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली.

पोलीस ठाण्यासमोर आंदाेलन

विकास लवांडे आणि कार्यकर्त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केले आहे. यावेळी आरोपींना अटक करण्याची मागी करण्यात आली. जोपर्यंत आरोपींना अटक करण्यात येत नाही. ताेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्यात येणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. लोणी काळभाेर पोलीस ठाण्याच्या परिसरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार हे लवांडे यांची भेट घेणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×