Breking News
मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवातमोशी इमारत दुर्घटना: प्राथमिक पाहणीनुसार संतृप्त घनकचऱ्याच्या आडव्या दाबामुळे इमारत उलटल्याचा अंदाज‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील पोलिसांना ९ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किटपुण्यातून पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त मध्यरात्रीनंतर वाहतूकीत बदलपुण्यात डाॅक्टरांकडे ५० हजारांची खंडणीची मागणीविवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर‘विठू माऊली’ कार्यक्रमातून दुमदुमणार हरिनामाचा गजरपुण्यातील त्या कर्तव्यदक्ष उपनिरीक्षकाचे निलंबन मागेमोशी कचरा डेपो दुर्घटना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी साधला संवाद

‘प्रारंभ २०२६’ मोहिमेद्वारे अधिकाधिक करदात्यांपर्यंत पोहोचणार

प्राप्तिकर प्रधान मुख्य आयुक्त विवेक वाडेकर यांची माहिती

marathinews24.com

पुणे – देशात १ एप्रिलपासून नवीन प्राप्तिकर कायदा लागू झाला असून, या कायद्यात कर प्रणाली अधिक सुलभ, पारदर्शक केली आहे. हा कायदा अधिकाधिक करदात्यांना समजावा यासाठी पुणे विभागाकडून ‘प्रारंभ २०२६’ ही जागरूकता मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे अधिकाधिक करदात्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती प्राप्तिकर पुणे विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त विवेक वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भग्न दगडांपासून अखंड श्रद्धेपर्यंत:सोमनाथची गाथा-ब्रिजेश सिंह – सविस्तर बातमी

वाडेकर म्हणाले, मोहिमेचे उद्घाटन १५ मे रोजी गणेशखिंड रस्त्यावरील कॉसमॉस टॉवर येथे होणार आहे. करदाते, कर सल्लागार, उद्योजक अशा सर्व संबंधित घटकांसाठी आहे. कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी, ज्येष्ठ उद्योजिका लीला पुनावाला, ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड अ‍ॅग्रिकल्चर’चे (एमसीसीआयए) प्रदीप भार्गव उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, पुणे हे इंडस्ट्री, उत्पादन, आयटी, शिक्षण, अभियांत्रिकी आदी क्षेत्रांचे हब असून, आर्थिक क्षेत्रांना चालना देणारे शहर असल्याने या मोहिमेला प्रारंभ पुण्यातून केला आहे. प्राप्तिकर पुणे विभागात २३ जिल्हे असून, त्या जिल्ह्यांमध्येही टप्प्याटप्प्याने ही मोहीम राबविली जाणार आहे.

करसाथी’ हा चॅटबॉट तयार

प्राप्तिकर कायदा समजण्यासाठी ‘करसाथी’ हा चॅटबॉट तयार केला आहे. वारंवार विचारण्यात येणार्‍या प्रश्नांच्या (एफएक्यू) उत्तरांसाठी ‘करसेतू’ ही सेवा मराठी भाषेतून उपलब्ध करून दिली आहे. प्राप्तिकर सेवा केंद्रातही ही सुविधा दिली जाणार आहे. नव्या कायद्याची मराठी भाषेतील पत्रके, पुस्तके तयार केली आहेत. संबंधित पुस्तक, पत्रकांचे प्रकाशनही कार्यक्रमात केले जाणार आहे. पत्रकांवर ‘क्यूआर’ कोड असणार आहे, असेही वाडेकर यांनी सांगितले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×