अडीच लाखांचे दागिने चोरुन चोरटे पसार
marathinews24.com
पुणे – पोलीस असल्याची बतावणी करुन ज्येष्ठ नागरिकाकडील अडीच लाख रुपयांचे दागिने चोरून चोरटे पसार झाल्याची घटना वारजे भागातील डुक्करखिंड परिसरात घडली.याप्रकरणी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अमली पदार्थ विक्रीतील आरोपीला मदत भोवली; पोलीस निलंबित – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे वारजे माळवाडी भागात राहायला आहेत. ते दररोज सायंकाळी चालायला जातात. रविवारी (१० मे) सायंकाळी सहाच्या सुमारास ते मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावरील सेवा रस्त्यावरुन निघाले होते. वारजे भागातील डु्क्करखिंड परिसरात चोरट्यांनी त्यांना अडवले. चोरट्यांनी पोलीस असल्याची बतावणी केली. या भागात ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याच्या घटना घडल्या आहेत. तुमच्याकडील दागिने काढून ठेवा, अशी बतावणी चोरट्यांनी केली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्याकडील सोनसाखळी, अंगठी असा दोन लाख ५२ हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला. अंगठी आणि सोनसाखळी कागदात बांधून देण्याचा बहाणा केला. त्यांना बोलण्यात गुंतविले. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरटे अंगठी आणि सोनसाखळी लांबवून पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे तपास करत आहेत.























