Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

अमली पदार्थ विक्रीतील आरोपीला मदत भोवली; पोलीस निलंबित

‘झेप’ बंगल्याचा ताबा प्रकरणात पोलीस शिपाई निलंबित

काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी निलंबित

marathinews24.com

पुणे – अमली पदार्थ विक्री प्रकरणात दाखल गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त डाॅ. सागर कवडे यांनी दिले. केतन उत्तम धेंडे (रा. लोणी काळभोर) असे निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने लोणी काळभोर भागात अमली पदार्थ विक्री प्रकरणात नुकतीच कारवाई केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याचे खुल्या कारागृहातून पलायन – सविस्तर बातमी

पोलीस कर्मचारी धेंडे यांनी या गुन्ह्यातील आरोपींना मदत करावी, यासाटी गुन्हे शाखेतील एका तपासी अधिकाऱ्याला दूरध्वनी केला होता. त्यांना प्रत्यक्ष भेटून त्याने प्रलोभन दाखविले होते. या प्रकरणाच्या तपासात हस्तक्षेप केला होता. हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आल्यानंतर खंडणी विरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल पोलीस उपायुक्त डाॅ. सागर कवडे यांच्याकडे सादर केला. त्यानंतर आरोपींना मदत करण्याचा ठपका ठेऊन धेंडे याला निलंबित करण्यात आले. धेंडे यांचे वर्तन पोलीस दलाचे प्रतिमा मलीन करणारे असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×