जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याचे खुल्या कारागृहातून पलायन

येरवडा जेल

येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी येरवड्यातील खुल्या कारागृहातून पसार झाल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पसार झालेल्या कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष लक्ष्मण भिंगारे (रा. पाचवड, ता. वाई, जि.सातारा) असे पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे. याबाबत कारागृहातील अधिकारी नागनाथ भानवसे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ८ मे रोजी ही घटना घडली.

‘बीएसएनएलची तार चोरणारे परप्रांतीय चोरटे अटकेत – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील भुईंज पोलीस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यात भिंगारे याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. कोल्हापूर येथील खुल्या जिल्हा कारागृहातून त्याला गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात येरवडा येथील खुल्या कारागृहात हलविण्यात आले. त्याची वर्तणूक चांगली होती. कारागृहात त्याला केशकर्तनाचे काम देण्यात आले होते. ८ मे रोजी वरिष्ठ अधिकारी हे खुल्या कारागृहातील शेती विभागाची पाहणी करत होते. त्यावेळी तुती बागेत एक मोबाइल सापडला. मोबाइलमध्ये सीमकार्ड नव्हते. या प्रकरणात भिंगारे याच्यासह आणखी एका कैद्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर भिंगारे कारागृहातील बराकीत गेला. चाैकशीसाठी त्याला बोलाविण्यात आल्यानंतर तो बराकीत नसल्याचे उघडकीस आले. पसार झालेल्या भिंगारेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक सत्रे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×