Breking News
जय गणेश पालकत्व योजना आदर्श व्यक्ती घडविणारी शाळाशिवराज्याभिषेक दिनी सोमेश्वरवाडीत रक्तदानाचा विक्रम; १२०३ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभागवैमनस्यातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वारपर्वती परिसरात तरुणाला चाकूच्या धाकाने लुटलेगॅस देयकाच्या नावाखाली महिलेची अडीच लाखांची फसवणूकजागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात साडेतीन हजाराहून अधिक सायकलप्रेमींचा उत्स्फूर्त सहभागपुण्यात रेव्ह पार्टीवर गुन्‍हे शाखेचा छापा – आयोजकांसह 78 जणांवर गुन्‍हा दाखल‘पेन्शन कार्ड’च्या बतावणीने ज्येष्ठाची १६ लाखांची फसवणूकउत्पादन, वितरण अन् बाजारपेठेची साखळी निर्माण करून महिला बचत गटांनी आर्थिक क्रांती करावी; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहनमाजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या कुटुंबीयांचे डॉ. नीलम गोऱ्हेंकडून सांत्वन

‘बीएसएनएलची तार चोरणारे परप्रांतीय चोरटे अटकेत

८० लाखांचा मुद्देमाल जप्त

marathinews24.com

पुणे – रामटेकडी ओैद्योगिक वसाहतीतील भूमिगत तांब्याची तार क्रेनचा वापर करुन चोरणाऱ्या उत्तर प्रदेशातील चोरट्यांसह नऊ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ८० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अस्लम सगीर खान, सलमान इद्रीस मलिक (दोघे रा. दिल्ली), आरिफ कुंदनखाँ खान, शोएब हारून खान, नबी मोहम्मद शान मोहम्मद (तिघे रा. उत्तर प्रदेश), नरेशकुमार शिवशरण (रा. हरयाणा), अनिस अन्सारी, अफाक अन्सारी, प्रवीण बागुल (रा. हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

मेफेड्रोन निर्मितीचा कारखाना सुरू करण्याच्या तयारीतील गजाआड – सविस्तर बातमी

रामटेकडी परिसरात वानवडी पोलिसांकडून सराइताची चौकशी करण्यात येत होती. त्या वेळी रामटेकडी ओैद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या परिसरातून भूमिगत तांब्याची तार काही जण क्रेनचा वापर करून काढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने चोरट्यांना पकडले. चोरट्यांकडून ३४ लाख ८० हजार रुपयांची तांब्याची तार, क्रेन, ट्रक, दुचाकी असा ८० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, उपनिरीक्षक अल्फाज शेख, गोपाळ मदने, अर्शद सय्यद, अमोल पिलाणे, अभिजित चव्हाण, सर्फराज देशमुख, गणेश भुजबळ यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×