Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

मेफेड्रोन निर्मितीचा कारखाना सुरू करण्याच्या तयारीतील गजाआड

कुुरकुंभ प्रकरणातील आरोपीची मदत घेतल्याचे उघड

marathinews24.com

पुणे – मेफेड्रोन (एमडी) निर्मितीचा कारखाना सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना वाघोली पोलिसांनी अटक केली. आरोपींनी कुरकुंभ अमली पदार्थ प्रकरणात जामीनावर असलेल्या एका आरोपीच्या मदत घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आरोपींकडून ४५ लाख रुपयांचे एमडी, महागड्या मोटारी असा एक कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

नीलेश घायवळ टोळीतील गुंड अटकेत – सविस्तर बातमी

वाघोली परिसरात मेफेड्रोन विक्री प्रकरणात पोलिसांनी कारवाई करून अनिस शम्मू सय्यद (वय २८, रा. कल्याणी पार्क, मांजरी), हरी उत्तम उफाडे (वय ३५,रा. अजमेरा सोसायटीजवळ, सिद्धार्थनगर, वाघोली), सुमीत अशोक घुले (वय ४१, रा. मांजरी), प्रतीक उर्फ सोन्याबापू होले (वय ३२, रा. मांजरी), ऋषीकेश अंकुश यनभर (वय २९, रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे) यांना १६ एप्रिल रोजी केसनंद परिसरातून अटक केली होती.

पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले होते. आरोपींनी वाघोली, केसनंद, लोणीकंद, तसेच शिरुर तालुक्यात मेफेड्रोन विक्री केल्याची माहिती मिळाली होती. घुले याला आकाश अशोक ढवळे (वय २६, रा. शिरुर) याने मेफेड्रोन विक्रीसाठी दिल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी ढवळे आणि रामनिवास रानूराम बिष्णोई (वय २५, रा. मुंढवा) यांना अटक केली. कुरकुंभ ओैद्योगिक वसाहतीत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकून साडेतीन हजार कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले होते. या प्रकरणात विपीनकुमार श्रीरामसागर पंडीत (वय ५४, रा. अंधेरी, मुंबई) याला अटक केली होती. पंडीत याला या प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

आरोपी ढवळे, बिष्णोई हे पंडीत याच्या संपर्कात आले होते. पंडीत त्यांना मेफेड्रोन तयार करुन देणार होता. तिघे जण मेफेड्रोन तयार करण्याचा कारखाना सुरु करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली. अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर, सहायक निरीक्षक विजय चंदन, प्रदीप मोटे, शेखर शिंदे, विशाल गायकवाड, गहिनीनाथ बोयणे, महादेव कुंभार, राहुल तुपारे यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×