Breking News
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळ व वार्षिक सर्वसाधारण बैठक पुणे येथे संपन्नराज्यातील ९९ टक्के वीज ग्राहकांना ग्रीड सपोर्ट चार्ज नाही‘महाज्योती’च्या गुणवंतांचे यूपीएससी निकालात ‘शतक’; भारतीय वन सेवा परीक्षेत ८ विद्यार्थ्यांची बाजीआईच्या प्रियकराचा तरुणीच्या प्रियकराकडून खूनहंगाम सन २०२५ राज्यस्तरीय पिकस्पर्धेत पुणे जिल्ह्यातील ८ शेतकरी ‍विजेतेचाकसमान धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी समाधान शिबिर आयोजित करागॅसबील अपडेटच्या बहाण्याने घातला गंडाविद्यार्थ्यांनी ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६’ स्पर्धेचा लाभ घ्यावाडिप्लोमा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी एक स्मार्ट आणि परिणामकारक पर्यायभिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करणार

पुण्यातील बुधवार पेठेत पुन्हा कारवाई; ५ बांगलादेशी महिला ताब्यात

जुन्या वादातून मारहाण करणारा अटकेत

फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत (रेड लाईट) पोलिसांनी पुन्हा कारवाई केली. या कारवाईत पाच बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी पाच महिलांविरुद्ध बेकायदा वास्तव्य केल्या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनैतिक संबंधातून तरुणाचा खून – सविस्तर बातमी

‘पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहर परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या आठवड्यात खडक पोलिसांनी बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत कारवाई करुन बांगलादेशी महिलांसह १५ जणांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर फरासखाना पोलिसांनी रविवारी मध्यरात्री वेश्यावस्तीत शोधमोहीम राबवून पाच बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले’, अशी माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी दिली. या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांनी भारतात घुसखोरी केल्याचे उघडकीस आले. त्या स्वेच्छेने देहविक्रय करत असल्याची माहिती मिळाली आहे. महिला बांगलादेशी असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. अतिरिक्त आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, उपनिरीक्षक अरविंद शिंदे, सुनील मोरे, महेश राठोड, गजानन सोनुने, वसीम शेख, रवींद्र बत्तीशे, राणी शिंदे, पूुनम ओव्हाळ, अर्चना ढवळे, करिष्मा कडाळे यांनी ही कारवाई केली.

शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन वर्षात १३० बांगलादेशींची मायदेशी (डिपोर्ट) करण्यात आले आहे. बुधवार पेठेतून ताब्यात घेण्यात आलेल्या ५२ महिलांना बांगलादेशात पाठविण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×