गुन्हे शाखेचा छापा; ४ तरुणी ताब्यात
marathinews24.com
पुणे – शहरातील कात्रजमधील आंबेगाव परिसरात एका लाॅजमध्ये सुरू असलेला देहविक्रयाचा प्रकार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला. पोलिसांनी लाॅजवर छापा टाकून चार तरुणींना ताब्यात घेतले. तरुणींना देहविक्रयास प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली.
स्वारगेट एसटी स्थानकात महिलांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी
सचिन बाबुराव गायकवाड (वय २८, सध्या रा. पानसरेनगर, कोंढवा, मूळ रा. मुळज, उमरगा ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कात्रजमधील आंबेगाव भागात द्वारिका लाॅजमध्ये देहविक्रय सुरू असल्याची मााहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली. पोलिसंनी लाॅजमधून चार तरुणींना ताब्यात घेतले. लाॅजमधील व्यवस्थापक गायकवाड याला तरुणींना देहविक्रय करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली.
अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छगन कापसे, उपनिरीक्षक विशांत चव्हाण, ईश्वर आंधळे, तुषार भिवरकर, बबनराव केदार, कोंडे, खेडेकर, इंगळे यांनी ही कारवाई केली.
























