Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

स्वारगेट एसटी स्थानकात महिलांचे दागिने चोरीला

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात वेगवेगळ्या घटनांत प्रवासी महिलांच्या गळ्यातील १ लाख ६९ हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात रविवारी (१० मे) सकाळी साडेआठच्या सुमारास प्रवासी महिलेच्या गळ्यातील १ लाख ४ हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी लांबविले. याबाबत एका महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसारचोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडल्याने मजुराचा मृ्त्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३५ वर्षीय महिला धनकवडीतील आंबेगाव पठार भागात राहायला आहेत. त्या उन्हाळी सुट्टी असल्याने मुलांसोबत माहेरी निघाल्या होत्या. गर्दीत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दागिने लांबविले. स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात सोमवारी (११ मे) एका महिलेच्या गळ्यातील ६५ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका ५४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला पिंपरी-चिंचवड परिसरातील चऱ्होली भागात राहायला आहेत. त्या गावी निघाल्या होत्या. गर्दीत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले. पोलीस उपनिरीक्षक कोतकर तपास करत आहेत. तसेच स्वारगेट एसटी स्थानक परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविण्याची घटना नुकतीच घडली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×