Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुण्यात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडल्याने मजुराचा मृ्त्यू

Construction worker death

दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – नियोजित गृहप्रकल्पात तिसऱ्या मजल्यावर काम करणारा बांधकाम मजूर तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली. सुरक्षाविषयक काळजी न घेणे, तसेच दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

बिबवेवाडीत महिलेची सोनसाखळी हिसकावली – सविस्तर बातमी

शंकर डुबकवाड (वय ५१, रा. बाेराटे वस्ती, खराडी) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. या प्रकरणी रमेश वंजारी, सुभाष साकोरे (रा. वडगाव शेरी), तसेच नामदेव गणगोपालवा (रा. बाेराटे वस्ती, खराडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत डुबकवाड यांचा मुलगा शिवानंद (वय २२) याने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी भागातील गणेशनगर भागात तीन मजली इमारतीचे काम सुरू आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर डुबकवाड हे रविवारी (१० मे) दुपारी पावणेचारच्या सुमारास काम करत होते. त्या वेळी तिसऱ्या मजल्यावर खडी उतरवित असताना डुबकवाड यांचा तोल गेला. तिसऱ्या मजल्यावरुन पडल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. बांधकाम ठेकेदार, तसेच संबधित इमारतीचे बांधकाम करुन घेणाऱ्या मालकांनी सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या नव्हत्या. नियोजित इमारतीच्या परिसरात संरक्षक जाळी बसविली नव्हती. सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने दुर्घटना घडल्याचे डुबकवाड यांचा मुलगा शिवानंद याने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक बाबर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×