Breking News
डिप्लोमा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी एक स्मार्ट आणि परिणामकारक पर्यायभिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करणारनिर्यातीच्या आमिषाने ४ कोटी ३२ लाखांची फसवणूकपुण्यात कौटुंबिक वादातून सुनेकडून सासूचा खूनप्रेमविवाह केल्याने तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वारस्वारगेट परिसरातील बेकायदा धंद्यांवर गुन्हे शाखेचा छापागुंतवणुकीवर परताव्याचे आमिष दाखवून जेष्ठाची फसवणूकऊसतोड कामगारांसाठीच्या कायद्याचा मसुदा संकेतस्थळावर प्रसिद्ध करा- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे‘प्रारंभ २०२६’ मोहिमेद्वारे अधिकाधिक करदात्यांपर्यंत पोहोचणारउष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची ६३ लाखांची फसवणूक

ज्येष्ठ नागरिकाची १ कोटी १७ लाखांची फसवणूक

चोरट्यांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची ६३ लाख ५६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे.

मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठाचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे कोथरूड भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. चोरट्यांनी त्यांना गुंतवणूक योजनांची माहिती दिली. त्यानंतर चोरट्यांच्या खात्यात ज्येष्ठ नागरिकाने वेळोवेळी ६३ लाख ५६ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर त्यांना परतावा मिळाल्याचे भासविण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात त्यांना परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×