Breking News

विद्यार्थ्यांनी ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६’ स्पर्धेचा लाभ घ्यावा

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे आवाहन

marathinews24.com

पुणे – पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६’ या स्पर्धेचे कृषी महाविद्यालय येथे १५ ते १७ मे २०२६ या कालावधीत आयोजन करण्यात येणार असून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे.

डिप्लोमा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी एक स्मार्ट आणि परिणामकारक पर्याय – सविस्तर बातमी

राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६’ या स्पर्धेचे १५ मे रोजी सकाळी ११.३० वाजता कृषी महाविद्यालय येथे उद्घाटन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत मृदा आरोग्य आणि व्यवस्थापन, स्मार्ट जल व्यवस्थापन आणि ऑटोमेशन, शेती यांत्रिकीकरण (एआय आणि रोबोटिक्स), कृषी प्रक्रिया आणि मूल्य साखळी, अक्षय ऊर्जा आणि कृषी-कचरा व्यवस्थापन, पीक संरक्षण आणि कीड व्यवस्थापन, हवामान-अनुकूल आणि डिजिटल शेती, प्रभावी कृषी प्रशासनासाठी एआय, तंत्रज्ञान आधारित हस्तक्षेप प्रभावी आपत्ती व्यवस्थापन, पीक नुकसानीचे मूल्यांकन आणि भाकितासाठी एआय, तंत्रज्ञान, साधने या विषयाशी निगडित नवकल्पना, उत्पादने असणार आहे.

या स्पर्धेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण कल्पना, उत्पादने यांना आकृष्ट करणे, सदर नव तंत्रज्ञांना योग्य व्यासपीठ व योग्य व्यवस्था निर्माण करणे या उद्देशाने या ॲग्री हॅकॅथॉनचे आयोजन करण्यात येत आहे, विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लाण्यासोबतच वैज्ञानिक संशोधनाला प्रोत्साहान मिळण्याकरिता ही स्पर्धा उपयुक्त ठरणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×