गॅसबील अपडेटच्या बहाण्याने घातला गंडा

 ऑनलाइन टास्कच्या आमिषाने ३३ लाखांची फसवणूक

सव्वा दोन लाखांची फसवणूक

marathinews24.com

पुणे – एमएनजीएल गॅस कंपनीचा खोटा मेसेज पाठवून बील अपडेट करण्याच्या बतावणीने सायबर चोरट्यांनी तरूणाला सव्वा दोन लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना ९ मे रोजी कोंढव्यात घडली आहे. याप्रकरणी तरूणाने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक व बँकखातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विद्यार्थ्यांनी ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६’ स्पर्धेचा लाभ घ्यावा-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोंढव्यात राहायला असून, ९ मे रोजी त्यांच्या मोबाइलवर सायबर चोरट्यांनी एमएनजीएल गॅस कंपनीचा मेसेज पाठविला होता. त्यानुसार बील अपडेट करण्याची बतावणी करीत त्यांना गॅस बील अपडेट अ‍ॅप डाउनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून २ लाख २७ हजारांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप तपास करीत आहेत.

गाडीत ठेवलेले ४ लाखांचे दागिने चोरीला

पुणे- गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवलेले ४ लाखांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ११ ते १२ मे रोजी उत्तमनगरमधील कोंढवे धावडे परिसरातील प्रथमेश वॉशिंग सेंटरनजीक घडली आहे. याप्रकरणी अहिरे गावात राहणार्‍या ४६ वर्षीय महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला अहिरे गावात राहायला असून, ११ ते १२ मे कालावधीत त्यांनी मोटारीत ४ लाखांचे सोन्याचे दागिने ठेवले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या गाडीतून दागिने चोरून नेले. गाडीत दागिने नसल्याचे दिसून आल्यानंतर महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपीचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक धनवडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×