Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पात्र उमेदवारांना प्रमाणपत्रे प्राप्त करून घेण्याचे आवाहन

महाटीईटी २०२५ पात्र उमेदवारांना १८ मे पासून प्रमाणपत्र वाटप

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२५ परीक्षेत पात्र उमेदवारांना १८ मे ८ जून २०२६ या कालावधीत प्रमाणपत्राचे वाटप केले जाणार आहे. तरी पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या मूळ कागदपत्रांसह आपण परीक्षा दिलेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षण निरीक्षक मुंबई (प/द/उ) यांच्या कार्यालयाशी स्वतः संपर्क साधून आपले प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती; जिल्हा वार्षिक योजनेसाठी १४७२ कोटींची तरतूद – सविस्तर बातमी

महाटीईटी- २०२५ परीक्षेचे आयोजन २३ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आले होते. या परीक्षेतील पेपर क्र. १ (इ. १ ली ते इ. ५ वी स्तर) व पेपर क्र. २ (इ. ६ वी ते इ. ८ वी स्तर) चा अंतिम निकाल ३ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आलेला होता.

महाटीईटी परीक्षेत पात्र उमेदवारांची पात्रता प्रमाणपत्र त्या त्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद, शिक्षण निरीक्षक मुंबई (प/द/उ) यांच्या कार्यालयाकडे देण्यात येत आहेत. पात्रता धारक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी परीक्षा परिषदेच्या http://www.mscepune.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही कळविण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×