भाईगिरी करणाऱ्या सराईताला केले स्थानबद्ध

पुण्यात जेष्ठ फळविक्रेत्या महिलेला मोफत राशनचे आमिष, अडीच लाखांना लुटले

विमानतळ पोलीसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून त्यांच्यावर भाईगिरी करणाऱ्या सराईताला १ वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. ऋतिक गौतम अवधुत ( रा संजयपार्क झोपडपट्टी, एअरपोर्ट रोड, विमाननगर) असे कारवाई केलेल्या आरोपीचे नाव आहे.

त्याच्यामुळे परिसरातील नागरिक दडपणाखाली वावरत होते.

आरोपी ऋतिकमुळे वारंवार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे त्याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई होण्यासाठी विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार त्याच्यावर एमपीडीएनुसार एक वर्षे स्थानबद्ध करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते.

ठेकेदाराकडून लाच घेणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला पकडले – सविस्तर बातमी

कारवाईचा आदेश पारित झाल्यापासुन आरोपी ऋतिक अवधुत हा फरारी झाला होता. पोलीस शिपाई पुंडे व पोलीस नाईक जोगदंडे यांना मिळालेल्या बातमीवरुन त्याला सोलापुरमधून ताब्यात घेत त्याची रवानगी छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह केली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक,अजय संकेश्वरी, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) आशालता खापरे, सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन, पोलीस कर्मचारी रुपेश पिसाळ, शैलेश नाईक, गिरीष नाणेकर, राकेश चांदेकर, अंकुश जोगदंडे, दादासाहेब बर्डे, योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, हरीप्रसाद पुंडे, लालु कऱ्हे, राहुल नाणेकर अर्चना शिंदे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×