आंबेगाव खुर्दमधील महिलेला सायबर चोरट्यांचा गंडा
marathinews24.com
पुणे – सायबर चोरट्यांनी नागरिकांना अक्षरशःलुटीच्या खाईत लोटले असून, शेअर मार्वेâटसह विविध आमिष दाखवून ऑनलाईनरित्या गंडा घातला जात आहे. यासंदर्भात पोलिसांकडून वारंवार आवाहन करूनही पुणेकर सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रामुख्याने गिफ्टचे आमिष, डिजीटल अरेस्टची धमकी, जादा नफा कमविण्याचे प्रलोभन, पार्सलमध्ये अमली पदार्थ आढळून आल्याची बतावणीसह अनेक कारणाद्वारे लुट केली जात आहे.
तरूणावर वार करून परिसरात दहशतीचा प्रयत्न, टोळक्यावर गुन्हा – सविस्तर बातमी
आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी आंबेगाव खुर्दमधील महिलेला तब्बल १५ लाख ४८ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ६ डिसेंबर २०२४ ते ७ जानेवारी २०२५ कालावधीत घडली आहे. याप्रकरणी ४१ वर्षीय महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक आणि बँकधारक अज्ञात चोरट्यांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कुटूंबियास आंबेगाव खुर्दमध्ये राहायला असून, सायबर चोरट्यांनी ६ डिसेंबरला त्यांना संपर्क केला. त्यांना व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेत सायबर चोरट्यांनी विश्वास संपादित केला. त्यानंतर सायबर चोरट्यांनी महिलेला आयपीओ गुंतवणूकीसाठी प्रलोभन दाखविले. गुंतवणूकीच्या परताव्यावर भरोसा ठेउन अवघ्या महिन्याभरात महिलेने तब्बल १५ लाख ४८ हजारांची गुंतवणूक केली. मात्र, त्यानंतर सायबर चोरट्यांनी महिलेसोबत संपर्क बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक गजानन चोरमले तपास करीत आहेत.