Breking News
हडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्नजणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगहसण्यातूनच वाढेल माणसाचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ – मकरंद टिल्लूतपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा -आमदार रोहित पवार

बालेवाडी, मुंढव्यातून साडेपाच लाखांचा ऐवज चोरीला

बालेवाडी, मुंढव्यातून साडेपाच लाखांचा ऐवज चोरीला

दोन स्वतंत्र घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी ५ लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज लंपास

marathinews24.com

पुणे – शहरात बालेवाडी आणि मुंढवा परिसरात झालेल्या दोन स्वतंत्र घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी ५ लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे समोर आले आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, दोन्ही प्रकरणांत संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शंकरशेठ रोडवर मेफेड्रॉनसह आरोपी जेरबंद; सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त – सविस्तर बातमी 

बालेवाडी परिसरातील विठ्ठल मंदिराजवळ असलेल्या झोलो पी.जी.मधील रूम फोडून चोरट्याने लॅपटॉप, घड्याळे, मोबाइलसह विविध वस्तूंवर डल्ला मारला. १९ मे रोजी सकाळी नऊ ते २० मे रोजी पहाटे साडेतीनच्या दरम्यान ही घटना घडली. अज्ञात आरोपीने रूमची चावी वापरून दरवाज्याचे लॉक उघडले आणि आत प्रवेश केला. त्यानंतर रूममधील दोन लॅपटॉप, दोन घड्याळे, एक लॅपटॉप बॅग, हार्ड ड्राईव्ह आणि मोबाइल असा एकूण ३९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीस नेला. या प्रकरणी २३ मे रोजी बाणेर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंढवा परिसरातील केशवनगर येथील बॉन विवांत सोसायटीतील फ्लॅटमध्येही चोरट्यांनी हात साफ केला. ए विंगमधील फ्लॅट क्रमांक २०६ मध्ये २५ एप्रिल ते २० मे दरम्यान चोरीची घटना घडली. घरातील कपाटाच्या ड्रॉवरचा दरवाजा कोणत्यातरी साधनाच्या मदतीने उघडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा तब्बल ५ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. संबंधित कुटुंबीयांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार मुंढवा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास बाणेर आणि मुंढवा पोलिसांकडून सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. शहरात गेल्या काही दिवसांत बंद फ्लॅट, पीजी निवासस्थाने तसेच कमी वर्दळीच्या ठिकाणांना लक्ष्य करून चोरीच्या घटना वाढताना दिसत आहेत. वाढत्या घरफोड्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर निवासी संकुल, पीजी चालक आणि नागरिकांनी सुरक्षा उपाय अधिक कडक करण्याची गरज व्यक्त होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×