Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

आत्महत्याचे धाडस नाही झालं …रेल्वे येताच तो बाजूला झाला अन…मित्राचा जीव गेला

आकुर्डी  रेल्वे स्थानकाजवळील घटना

marathinews24.com

पिंपरी चिंचवड – मैत्रिणीसह भागीदारीत असलेल्या कॅफेच्या आर्थिक कारणावरून दोन मित्रांचे भांडण झाले. त्याच रागातून मित्राने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या करणार असल्याचा बनाव रचला. त्यामुळे दुसरा मित्र त्याला वाचविण्यासाठी लोहमार्गावर गेला. मात्र, रेल्वे येताच आत्महत्येचा प्रयत्न करणारा बाजूला झाला अन त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या मित्राचा रेल्वेच्या धडकेत ठार झाल्याची दुर्दैवी घटना पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी  रेल्वे स्थानकाजवळ ३ एप्रिलला घडली आहे.

पुणे : नागरिकांनो सावधान, तुमचा ऐवज सांभाळा – सविस्तर बातमी 

गणेश विठ्ठल लाड (रा. बारामती) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. विठ्ठल किसन लाड (वय ५३ ) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिजित गणेश गोळे (वय २५, रा. भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

गणेश लाड आणि अभिजित गोळे हे मित्र होते. गणेशच्या मैत्रिणीवरून दोघांमध्ये भागीदारीत असलेल्या कॅफेच्या आर्थिक कारणावरून त्यांच्यात वाद झाले. त्यावरून अभिजितने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या करणार असल्याचा बनाव केला. तो रावेतनजीक आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ लोहमार्गावर गेला. त्याला वाचवण्यासाठी गणेश गेला होता. अभिजित लोहमार्गावर असल्याने त्याला बाजूला करण्यासाठी गणेश लोहमार्गावरून जात होता. त्याचवेळी रेल्वे आली असता अभिजित अचानक ट्रॅकवरून बाजूला झाला. मात्र, गणेश रेल्वेखाली चिरडला गेला. जखमी गणेशला रुग्णालयात उपचारासाठी दाखल न करता अभिजित पळून गेला. त्यामुळे उपचाराअभावी गणेशचा मृत्यू झाला. फौजदार राहुल खिळे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×