उत्कृष्ट कामगिरी बजावल्यामुळे पुण्यातील विविध पदावर काम करणाऱ्या पोलिसांना सन्मान चिन्हाने गौरविले
marathinews24.com
पुणे– महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस खात्यात उत्कृष्ट कामगिरी बजावल्यामुळे पुण्यातील ३ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह २० पोलीस अधिकारी- हवालदारांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी संबंधित अंमलदार- अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
शाब्बास पुणे ग्रामीण पोलीस; विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडून कौतुक – सविस्तर बातमी
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीळकंठ जगताप, दिलीप फुलपगारे, गणेश माने यांच्यासह पुणे शहर पोलीस दलातील २० पोलीस अधिकारी, पोलीस हवालदारांना १५ वर्षाहून अधिक सेवा कालावधीत प्रशंसनीय सेवेसाठी पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. निळकंठ राजाराम जगताप (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा पोलीस ठाणे), दिलीप मगनशेठ फुलपगारे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी पोलीस ठाणे), गणेश जगन्नाथ माने (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा), ज्ञानेश्वर काळुराम नागवडे (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, चंदननगर पोलीस ठाणे), प्रविण पंढरीनाथ जगताप (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, हडपसर पोलीस ठाणे), राजू उत्तम जाधव (सहायक पोलीस फौजदार, खडकी पोलीस ठाणे) सौदागर भगवान माने (सहायक पोलीस फौजदार, वानवडी पोलीस ठाणे), राहुल देवराम मखरे (सहायक पोलीस फौजदार, गुन्हे शाखा), संजयकुमार ज्ञानोबा भोसले (सहायक पोलीस फौजदार, विशेष शाखा), रमेश वसंत दळवी (सहायक पोलीस फौजदार बॉम्ब शोधक व नाशक पथक)
राहुल विष्णु जोशी (पोलीस हवालदार, फरासखाना पोलीस ठाणे), पांडुरंग सुभाष पवार (पोलीस हवालदार, गुन्हे शाखा), शरद बबन वाकसे (पोलीस हवालदार, गुन्हे शाखा), राजू यशवंत कदम (पोलीस हवालदार, मुंढवा पोलीस ठाणे), ऋषिकेश गुलाबराव महल्ले (पोलीस हवालदार, कोंढवा पोलीस ठाणे), प्रमोद बबन टिळेकर (पोलीस हवालदार, गुन्हे शाखा), अमजद गुलाब पठाण (पोलीस हवालदार, बंडगार्डन पोलीस ठाणे), राहुल,रामचंद्र माने (पोलीस हवालदार, फरासखाना पोलीस ठाणे), अतुल ज्ञानेश्वर साठे (पोलीस हवालदार, शिवाजीनगर पोलीस ठाणे), सुरेखा दीपक महाजन (पोलीस हवालदार, नियंत्रण कक्ष, पुणे शहर) अशी महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झालेल्याची नावे आहेत.