चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – मोटार चालकाने पीएमपी चालकाला मारहाण केल्याची घटना कोंढव्यताील येवलेवाडी भागात घडली. या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध येवलेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याबाबत पीएमपी चालक अशोक पांडुरंग पवार (वय ४०) यांनी येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (२१ जून) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पीएमपी बस सासवडकडे निघाली होती. येवलेवाडी परिसरात पीएमपी बस मोटारीला घासून गेली. त्यानंतर मोटार चालकाने पीएमपी चालक पवार यांना शिवीगाळ केली. पीएमपी बसच्या केबीनमधून खाली खेचले. बस चालक पवार यांना मारहाण करुन मोटार चालक पसार झाला. पवार यांचा गणवेश फाडला. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक चाऊस तपास करत आहेत.























