Breking News
मनसेच्या आंदोलनानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यानी कंत्राटदाराला झापलेदुचाकीवर गांजाविक्रीचा प्रयत्ननागरिककेंद्रित विकासातून शाश्वत विकासाला गती द्या – मुख्य सचिव राजेश अग्रवालपुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्धगणेशोत्सवासाठी पुणे जिल्ह्यात २७ विशेष कार्यकारी दंडाधिकारी नियुक्तगुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची १५ लाखांची फसवणूकज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून एक लाखांचे दागिने चोरीलाजिल्हाधिकारी कार्यालयात समाज कल्याण विभागाच्या विविध कामकाज आढावा बैठका संपन्नडीजे, लेझरमुक्त गणेशोत्सवाचा आदर्श ‘पुणे पॅटर्न’ निर्माण व्हावाशिक्षणाच्या बळावर भटके-विमुक्त समाजाने प्रगतीची नवी ओळख निर्माण करावी

दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

दुचाकीस्वाराविरुद्ध वानवडी पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – भरधाव दुचाकीच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना हडपसरमधील वैदुवाडी चौकात घडली. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गंगाराम रामदास मिरेकर (वय ४२, रा. पवार हाईट्स, शंकरमठ, वैदुवाडी, पुणे-सोलापूर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत मिरेकर यांचा भाऊ बाळू (वय ४०) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अल्पवयीन मुलीच्या शोधासाठी कोंढवा पोलिसांची तत्परता – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरेकर हे शनिवारी (२० जून) सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावरुन निघाले होते. हडपसरमधील वैदुवाडी चौकातून ते रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव दुचाकीने मिरेकर यांना धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,पोलीस उपनिरीक्षक लोंढे तपास करत आहेत.

शहर परिसरात गेल्या तीन दिवसात गंभीर अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहेत. बहुतांश अपघात हे वाहनचालकांच्या बेदरकारपणामुळे घडले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×