पर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूक

पर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूक

बनावट धनादेश, खोट्या बँक पावत्या अन् १९.८८ लाखांचा आर्थिक फसवणूक

marathinews24.com

पुणे – नेटवर्क केबल आणि कॉम्प्युटर साहित्याची ऑर्डर देऊन बनावट बँक खात्याचे धनादेश आणि खोट्या बँक पावत्या पाठवून पर्वती येथील एका सिक्युरटेक कंपनीची तब्बल १९ लाख ८८ हजार ४३६ रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविंद्र मधुकर ढेकणे (रा. बिबवेवाडी, पुणे), आप्पा (पूर्ण नाव माहीत नाही) आणि अक्षय सेल्स कॉर्पोरेशनचे संचालक (सदाशिव पेठ, पुणे) यांच्यावर पर्वती पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. याबाबत राहुल शांतीलाल मुथा (वय ४८, रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. दि. २२ एप्रिल २०२६ ते दि. ५ ऑगस्ट २०२५ या दरम्यान घटना घडली.

गाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगड – सविस्तर बातमी 

आरोपींनी संगनमत करून फिर्यादींच्या ‘आर ईशा सिक्युरटेक प्रा. लि.’ या कंपनीकडून आठ लाख ३२ हजार १३६ रुपयांचे नेटवर्क केबलचे बॉक्स खरेदी केले. त्याचे पेमेंट करण्यासाठी एसव्‍हीसी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शिल्लक नसलेल्या खात्याचा धनादेश दिला. तसेच बँक खात्यात पैसे भरल्याचा खोटा रिसीटचा फोटो ई-मेल वर पाठवून धनादेश बाऊन्स करून फसवणूक केली. त्याचप्रमाणे आरोपींनी फिर्यादींचे ओळखीचे मंगेश विलासराव गावंडे यांच्या ‘इलेक्ट्रेनिया डॉट कॉम’ या कंपनीकडून कॉम्प्युटर माऊस, हार्ड डिस्क आणि लॅपटॉप असा एकूण ११ लाख ५६ हजार ३०० रुपयांचा माल मागवला आणि त्यांनाही याच पद्धतीने बनावट धनादेश देऊन फसवले. अशा प्रकारे फिर्यादी व मंगेश गावंडे यांची मिळून १९ लाख ८८ हजार ४३६ रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्‍याचे तक्रारीत नमूद केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×