Breking News
रासे गृहसंकुल प्रकल्पामुळे आदिवासी कुटुंबाना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा मार्ग सुकर – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारएचआयव्हीग्रस्त मुलांच्या निवाऱ्याच्या नावावर खंडणीश्रीक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी शासन सकारात्मक; संस्थानच्या मागण्यांवर योग्य निर्णय घेणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारमराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्यपुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीरप्रोफेशनल रियल्टर्स असोसिएशन ऑफ पुणेतर्फे (प्रॉप) ‘प्रॉप कनेक्ट २०२६’ राष्ट्रीय परिषदेचे ६ जुलैला आयोजनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारथी कार्यालयास भेटलष्करी गणवेश शिवण्याच्या बतावणीने टेलरिंग व्यावसायिकाची फसवणूकपुण्यात गणेश पेठेत भरदिवसा घरफोडीनिलेश घायवळ टोळीतील गुंड अटकेत

प्रोफेशनल रियल्टर्स असोसिएशन ऑफ पुणेतर्फे (प्रॉप) ‘प्रॉप कनेक्ट २०२६’ राष्ट्रीय परिषदेचे ६ जुलैला आयोजन

उदयन माने यांची पत्रकार परिषदेत माहिती; देशभरातील दोन हजारांहून अधिक रियल्टर्स, ३०० विकसक सहभागी होणार

marathinews24.com

पुणे – दी प्रोफेशनल रियल्टर्स ऑफ पुणे (प्रॉप) आणि नॅशनल असोसिएशन ऑफ रियल्टर्स-इंडिया (नार-इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रॉप कनेक्ट २०२६’ या देशातील सर्वात मोठ्या एकदिवसीय रियल इस्टेट सल्लागार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद रविवार, ६ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत हॉटेल जेडब्ल्यू. मॅरिएट, पुणे येथे होणार आहे. देशातील ३८ शहरांतील दोन हजारांहून अधिक रियल्टर्स आणि ३०० हून अधिक विकसक सहभागी होणार आहेत, अशी माहिती ‘प्रॉप’चे अध्यक्ष उदयन माने आणि ‘प्रॉप कनेक्ट २०२६’चे संयोजक रमेश तोष्णीवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारथी कार्यालयास भेट – सविस्तर बातमी

या पत्रकार परिषदेला माजी अध्यक्ष दर्शन चावला, तनुज नगरानी (उपाध्यक्ष – बिल्डर रिलेशन्स अँड स्पॉन्सरशिप), नीरज सिंग (उपाध्यक्ष – टेक्नॉलॉजी अँड कम्युनिकेशन), मनीष दीडमिसे (सचिव), मुरली रमनी (खजिनदार), दिनेश राठी (संचालक – ट्रेनिंग अँड मेंबरशिप सर्कल), सारंग मद्रेवार (संचालक – स्पोर्ट्स अँड कल्चरल फंक्शन्स), महेश यादव (संचालक – प्रॉप ग्रोथ), रवींद्र यादव (संचालक – डिजिटल पीआर/मीडिया), विक्रम मलिक (संचालक – बिझनेस एक्स्चेंज अँड क्रॉस सेल) आणि प्रीत कोहली (संचालक – इव्हेंट्स, एंगेजमेंट अँड नेटवर्किंग) उपस्थित होते.

उदयन माने म्हणाले, ‘रियल्टर्स – फ्युएलिंग द फ्युचर’ या संकल्पनेवर आधारित या परिषदेत रियल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञ, विकसक, धोरणकर्ते आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवर एकत्र येणार आहेत. नेटवर्किंग, ज्ञानविनिमय आणि व्यवसायवृद्धीसाठी हे व्यासपीठ महत्त्वाचे ठरणार आहे. प्रॉप कनेक्ट २०२६ हा रियल्टर समुदायाच्या कार्याचा गौरव करणारा आणि देशातील संघटित रियल इस्टेट क्षेत्राला एकत्र आणणारा उपक्रम आहे. पुण्याच्या भविष्यातील विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन, उद्योजकता आणि व्यवसाय विस्तार यांसारख्या विषयांवर परिषदेमध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

रमेश तोष्णीवाल म्हणाले, “पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. अभिजित चौधरी पुण्याच्या पुढील विकासाच्या दिशेबाबत व्याख्यान देणार आहेत. तसेच ‘द पंचशील स्टोरी’ या विशेष संवादामध्ये अतुल चोरडिया सहभागी होणार असून, ‘स्टोरी ऑफ द टायटन्स’ या सत्रात देशातील आघाडीचे विकसक रियल इस्टेट क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात चर्चा करणार आहेत. पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकही विविध चर्चासत्रांत सहभागी होणार आहेत.”

दर्शन चावला यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑटोमेशन या विषयावर वैभव सिसिंटी, तर सीए सार्थक आहुजा २०२७ मधील रियल इस्टेट बाजारपेठेचा आढावा सादर करणार आहेत. राजीव तलरेजा व्यवसाय विस्तारावर मार्गदर्शन करणार असून, विनोदी कलाकार विपुल गोयल यांच्या कार्यक्रमाने परिषदेची सांगता होईल. याशिवाय सीएसआर उपक्रम, भागीदारांचा गौरव आणि गाला डिनरचेही आयोजन करण्यात आले आहे.

तनुज नगरानी यांनी सांगितले की, रिअल्टर्स आणि विकसक यांच्यात अधिक प्रभावी समन्वय निर्माण करणे आणि उद्योगातील नव्या संधींबाबत मार्गदर्शन करणे हा परिषदेचा उद्देश आहे. ३०० हून अधिक विकसक आणि भागीदारांचा सहभाग हा संघटित रिअल्टर चळवळीला मिळालेल्या पाठिंब्याचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×