Breking News
रासे गृहसंकुल प्रकल्पामुळे आदिवासी कुटुंबाना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा मार्ग सुकर – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारएचआयव्हीग्रस्त मुलांच्या निवाऱ्याच्या नावावर खंडणीश्रीक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी शासन सकारात्मक; संस्थानच्या मागण्यांवर योग्य निर्णय घेणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारमराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्यपुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीरप्रोफेशनल रियल्टर्स असोसिएशन ऑफ पुणेतर्फे (प्रॉप) ‘प्रॉप कनेक्ट २०२६’ राष्ट्रीय परिषदेचे ६ जुलैला आयोजनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारथी कार्यालयास भेटलष्करी गणवेश शिवण्याच्या बतावणीने टेलरिंग व्यावसायिकाची फसवणूकपुण्यात गणेश पेठेत भरदिवसा घरफोडीनिलेश घायवळ टोळीतील गुंड अटकेत

एचआयव्हीग्रस्त मुलांच्या निवाऱ्याच्या नावावर खंडणी

तुळापूरातील पार्टीत पुण्यातील पबमधील मद्यसाठा

भिम संघर्ष संघटनेच्या अध्यक्षासह तिघे जाळ्यात

marathinews24.com

पुणे – एचआयव्ही बाधित मुलांसाठी निवारा उभारणाऱ्या संस्थेचे बांधकाम पाडण्यासाठी महापालिकेत तक्रार करून, उर्वरित बांधकाम वाचवायचे असेल तर १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी भिम संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद गायकवाड यांच्यासह चौघांना सापळा रचून अटक केली. ५० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना ही कारवाई करण्यात आल्‍याची माहिती पोलिसांनी दिली.

आमदार धनंजय मुंडे यांनी घेतली घुले कुटुंबियांची भेट – सविस्तर बातमी

अटक करण्यात आलेल्यांमध्ये विनोद निवृत्त गायकवाड (वय ५३, विंझर, ता. वेल्हा) संग्राम दत्तात्रय सोनवणे (वय ३०) सुधीर मुगुट शेडगे (वय ३८) निलेश कुंभार अशा चौघांना अटक करण्यात आली आहे. चौघांनाही २९ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

तर आरपीआय (खरात गट) पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कांबळे याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हे ‘ममता फाऊंडेशन’च्या माध्यमातून एचआयव्ही बाधित मुलांसाठी मांगडेवाडी येथे निवारा उभारत आहेत. महापालिकेने नोटीस दिल्यानंतर त्यांनी बांधकाम थांबविले होते. तरीही २१ मे रोजी केवळ त्यांच्या बांधकामावर कारवाई झाली. परिसरातील इतर बांधकामांना हात न लावल्याने त्यांनी चौकशी केली असता, विनोद गायकवाड यांनी महापालिकेकडे तक्रार केल्याची माहिती मिळाली. यानंतर आरोपींनी तक्रार मागे घेण्याचे आणि उर्वरित बांधकाम पाडले जाणार नाही, असे आश्वासन देत १० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला ‘टोकन’ म्हणून १० हजार दिले. त्यानंतर ५ हजार रुपये ऑनलाइन घेतले. नंतर पुन्हा पैशांसाठी धमक्या देण्यात आल्या. अखेर फिर्यादींनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी सापळा रचून किनारा हॉटेल येथे ५० हजार रुपये स्वीकारताना विनोद गायकवाड, संग्राम सोनवणे आणि सुधीर शेडगे यांना रंगेहाथ पकडले.

या प्रकरणामुळे अनधिकृत बांधकामांवर कारवाईच्या नावाखाली काही समाजसेवी संस्था किंवा व्यक्तींना लक्ष्य करून खंडणी उकळण्याचे रॅकेट कार्यरत आहे का, तसेच महापालिकेतील काही अधिकाऱ्यांचे त्यांना पाठबळ आहे का, याबाबत संशय व्यक्त होत आहे.

या अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरू असून सहायक पोलिस निरीक्षक गणेश मोहिते अधिक तपास करीत आहेत. ही कारवाई पोलिस उपायुक्‍त मिलिंद मोहिते, सहायक पोलिस आयुक्‍त राहुल आवारे यांच्‍या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील, गुन्‍हे निरीक्षक कैलास कोडग, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, अमंलदार मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, महेश बारवकर यांच्‍या पथकाने ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×