Breking News
आषाढी वारीसाठी मोठा बंदोबस्त- पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्लविना लेबल व भेसळीच्या संशयावरून तुप व नमकीन या अन् पदार्थाचा साठा जप्तसिंहगड एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक मारुती नवले यांच्याविरुद्ध गुन्हाअडीच कोटींचे सोने घेऊन कारागिर पसारआकाशवाणी पुणे केंद्रावर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६’ विषयावर विशेष मुलाखत प्रसारितपुण्यातील मंदिरांना मिळणार नवी ओळखशेतकरी कर्जमुक्तीसाठी नैसर्गिक शेती अभियान ठरत आहे मैलाचा दगडअटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची ७४ लाखांची फसवणूकगुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची ५५ लाखांची फसवणूकपुण्यात फरार गुंडाच्या बेकायदा हाॅटेलवर बुलढोझर

अडीच कोटींचे सोने घेऊन कारागिर पसार

तुळापूरातील पार्टीत पुण्यातील पबमधील मद्यसाठा

सराफ व्यवसायिकाकडून तक्रार दाखल

marathinews24.com

पुणे – दागिने घडविण्यासाठी दिलेले अडीच कोटी रुपयांचे शुद्ध सोने घेऊन कारागिर पसार झाल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी कारागिरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका सराफ व्यावसायिकाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कारागिर प्रबंजन शांती डोलाई (वय ३६, सध्यचा रा. गणेश पेठ), सिद्धार्थ चक्रवर्ती यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची ७४ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसंनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सराफ व्यावसायिकाची रविवार पेठेतील सराफ बाजारात पेढी आहे. आरोपी हे मूळचे पश्चिम बंगालमधील आहेत. जानेवारी २०२३ मध्ये आरोपी कारागिरांनी सराफ व्यावसायिकाला कमी मजुरीत दागिने घडवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आराेपीना त्यांनी वेळोवेळी शुद्ध सोने दागिने घडविण्यास दिले. आरोपींनी त्यांना दागिने घडवून दिले नाहीत. तक्रारदाराने याबाबत विचारणा केली.तेव्हा दागिने घेऊन कारागिर पसार झाले. पसार झालेले कारागिर पश्चिम बंगालमधील मूळगावी गेल्याची शक्यता आहे. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×