Breking News
विवाह प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे आवाहनपवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबविणारसिया आणि चेतनची न्यायालयीन कोठडीत रवानगीआषाढी वारीसाठी मोठा बंदोबस्त- पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्लविना लेबल व भेसळीच्या संशयावरून तुप व नमकीन या अन् पदार्थाचा साठा जप्तसिंहगड एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक मारुती नवले यांच्याविरुद्ध गुन्हाअडीच कोटींचे सोने घेऊन कारागिर पसारआकाशवाणी पुणे केंद्रावर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६’ विषयावर विशेष मुलाखत प्रसारितपुण्यातील मंदिरांना मिळणार नवी ओळखशेतकरी कर्जमुक्तीसाठी नैसर्गिक शेती अभियान ठरत आहे मैलाचा दगड

सिया आणि चेतनची न्यायालयीन कोठडीत रवानगी

- केतनच्या खून प्रकणात आता मानसशास्त्रीय पध्दतीचा वापर

केतन अगरवाल हत्याकांड प्रकरण

marathinews24.com

पुणे – व्यावसायिक केतन अगरवाल यांच्या हत्याकांडातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. दोघांचीही पोलीस कोठडी संपल्यामुळे पोलिसांनी त्यांना शुक्रवारी (दि.३) वडगाव मावळ न्यायालयात हजर केले होते. यावेळी पोलिसांनी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पोलिसांची मागणी फेटाळून लावत आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. न्यायाधीश ए.एम. विभूते यांच्या कोर्टात ही सुनावणी पार पडली.

आषाढी वारीसाठी मोठा बंदोबस्त- पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल – सविस्तर बातमी

आरोपी सिया आणि चेतन पोलीस कोठडीत असताना तपास यंत्रणांनी अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा केल्याचा दावा न्यायालयात केला. घटनास्थळाचा पंचनामा, आरोपींनी सराव केलेल्या ठिकाणाचा पंचनामा, फाडून टाकलेल्या पासपोर्टशी संबंधित ठिकाणाचा पंचनामा, आरोपींचे कपडे जप्त करणे आणि मोबाईलमधील डिलीट डेटा रिकव्हरच्या तपासाची माहिती न्यायालयासमोर मांडण्यात आली. आरोपींच्या मोबाईलमधील डेटा मिळाला असून त्याची समोरासमोर पडताळणी करणे आवश्यक आहे. रिकव्हर केलेल्या डेटामध्ये सांकेतिक भाषा आणि निकनेमचा वापर करून संवाद झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.

सरकारी वकिल, बचाव पक्षाचा युक्तीवाद

सियाचा दुसरा मोबाईलही जप्त असून, त्यामधील डिलीट डेटा रिकव्हर केला आहे. त्यातील भाषा आणि निकनेमची पडताळणी करण्यासाठी आरोपींची समोरासमोर चौकशी करणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलीस कोठडी देणे गरजेचे असल्याचा आग्रह सरकारी वकिलांनी केला होता. मात्र, बचाव पक्षाचे वकील विपुल दूशिंग यांनी सिया तपासात पूर्ण सहकार्य करत आहे. पोलिसांनी ज्या मोबाईलचा उल्लेख केला, तो आधीच जप्त केला आहे. केवळ मोबाईलमधील संदेशांचा अर्थ लावण्यासाठी किंवा सांकेतिक चिन्हांची पडताळणीसाठी पोलीस कोठडी मागणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नसल्याचा युक्तीवाद केला. तर चेतन चौधरी यांच्या वकिलांनीही पोलिसांकडे केवळ शक्यता आणि संशय असल्याचे सांगितले. ठोस कारणांशिवाय आरोपींना पुन्हा पोलीस कोठडीत ठेवणे योग्य नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

आरोपींच्या संमतीशिवाय नार्को टेस्ट नाही-न्यायालय

नार्को विश्लेषण चाचणीसाठी आरोपींची संमती आवश्यक असते. त्यांच्या संमतीशिवाय चाचणीला परवानगी देता येणार नाही, असे न्यायाधिशांची सांगितले. दरम्यान, दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पोलिसांची आणखी तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावली. त्यानंतर सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.

प्रत्यक्षदर्शीचा जबाब नोंदवला, कोणालाही ताब्यात घेतले नाही-पोलीस अधीक्षक

केतन अगरवाल हत्याकांडावेळी घटनास्थळी काहीजण प्रत्यक्षदर्शी होते. संबंधितांचा जबाब आम्ही नोंदविला असून, त्यादृष्टीने तपासही केला जात आहे. दरम्यान, याप्रकरणी अद्यापही दोघांव्यतिरिक्त पोलिसांनी कोणालाही ताब्यात घेतले नाही. आरोपींच्या मोबाइलमधील जप्त केलेल्या संभाषणांचा नेमका अर्थ, कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास करणे बाकी असल्याचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×