Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पालखी सोहळ्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून पाच हजारांचा बंदोबस्त

पालखी मार्गावर ‘डीजे’ वापरण्यास बंदी

marathinews24.com

पुणे – ‘आषाढ वारीसाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून पाच हजार पोलिसांचा बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे. पालखी मार्गावर पोलिसांकडून फिरते मदत केंद्र ठेवण्यात येणार आहे’, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली. पालखी सोहळा शांततेत, तसेच सुरळीत पार पाडण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. पोलीस अधीक्षक गिल यांनी शुक्रवारी बंदोबस्ताबाबतची माहिती पत्रकारांना दिली. पोलीस अधीक्षक गिल म्हणाले, ‘पालखी सोहळ्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज यांच्या सहा संताच्या पालख्या सहभागी होणार आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून नीरामार्गे सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

विवाह प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे आवाहन – सविस्तर बातमी

पुणे जिल्ह्यातील पालखी सोहळ्याचा मार्ग ५५ किलोमीटर आहे. श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा मार्ग १६० किलोमीटर आहे. पालखी सोहळ्यात अनुचित घटना घडू नये म्हणून बंदोबस्ताची आखणी केली आहे. पालखी सोहळ्यावर पोलिसांच्या ड्रोन कॅमेऱ्यांची नजर राहणार नाही. अन्य कोणालाही ड्रोन कॅमेऱ्यांचा परवानगी दिली जाणार नाही. पालखी मार्गावर स्वागत कक्ष उभारण्यात येतात. तेथे ध्वनीवर्धक, डीजे यंत्रणेचा वापर करण्यात येतो. डीजे, ध्वनीवर्धकाचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे.’

‘पालखी सोहळ्यानिमित्त वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे. महिलांची छेडछाड, मोबाइल चोरी, दागिने चोरी अशा प्रकारच्या घटना घडतात. पोलिसांकडून विशेष पथके पालखी मार्गावर तैनात करण्यात येणार आहे. गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तात सहभागी होणा आहे. पालखी मार्गावर पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात कjण्यात येणार आहे. पालखी मार्गावर ‘हरित वारी’ उपक्रमातंर्गत वृक्षारोपण करण्यात येणार आहे.’

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×