Breking News
बारामती येथे शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील विविध महत्त्वाकांक्षी उपक्रमांचा शुभारंभराज्यात २३ ठिकाणच्या दुध डेअर्‍यावर छापेमारीपुण्यात पावसामुळे सोसायटीतील सीमाभिंत कोसळून १८ वाहनांचे नुकसानघरकाम करणाऱ्या महिलेकडून २ लाखांच्या अंगठ्या लंपासपीएमपी प्रवासी महिलेचे दागिने चोरीलाविशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत घरभेटींची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून पाहणीबेल्हे येथे ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचे उद्या उद्घाटनएसएनडीटी महिला विद्यापीठाच्या १११ व्या स्थापना दिनानिमित्त भारतरत्न महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचे राज्यपालांच्या हस्ते अनावरणतळेगाव नगर परिषदेअंतर्गत संभाजीनगर येथील पाणीपुरवठा योजनेच्या तांत्रिक चाचणीबाबतचा खुलासाशासकीय नोकरीच्या आमिषाने १५ लाखांची फसवणूक

नवले पूल परिसरात ट्रक चालकाला लुटणारे गजाआड

ट्रक चालक तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – ट्रक चालकाला धमकावून चोरटे ट्रक घेऊन पसार झाल्याची घटना बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात घडली. पसार झालेल्या तिघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याबरोबर असलेल्या अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे.
आनंद गजानन जामकर (वय २५, रा. सुरेखा पॅलेस, बाणेर), व्यंकटेश महादेव देवणे (वय २२, रा. निर्वाणा पॅलेस, बावधन), स्वराज वैजनाथ टाक (वय २४, रा. सिंहगड काॅलेज कर्मचारी वसाहत, आंबेगाव बुद्रुक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका ट्रक चालक तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बुधवार पेठेत तरुणांना धमकावले, लुटणाऱ्या पोलिसांविरुद्ध खंडणीचा गुन्हा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालक तरुण मूळचा पुरंदर तालुक्यातील नाझरे गावचा रहिवासी आहे. तो शनिवारी (४ जुलै) मध्यरात्री दोनच्या सुमारास मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरातून कात्रजकडे निघाला होता. कात्रज बाह्यवळण मार्गावर पाठीमागून आरोपी दुचाकीवरुन आले. त्यांनी हाॅर्न वाजवून ट्क थांबविला. ट्रक चालकाला शिवीगाळ करुन केबीनमधून खाली खेचले. त्यानंतर ट्रक चालकाला मारहाण करुन खिशातील १५०० रुपये काढून घेतले. ट्रक चालकाला मारहाण करुन ट्रक ताब्यात घेतला. त्यानंतर आरोपी ट्रक घेऊन पसार झाले. घाबरलेल्या ट्रक चालकाने तातडीने या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे, भारती विद्यापीठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपास करुन आरोपींना पकडले. त्यांच्याबरोबर असलेल्या अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक मोकाशी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×