Breking News
बारामती येथे शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील विविध महत्त्वाकांक्षी उपक्रमांचा शुभारंभराज्यात २३ ठिकाणच्या दुध डेअर्‍यावर छापेमारीपुण्यात पावसामुळे सोसायटीतील सीमाभिंत कोसळून १८ वाहनांचे नुकसानघरकाम करणाऱ्या महिलेकडून २ लाखांच्या अंगठ्या लंपासपीएमपी प्रवासी महिलेचे दागिने चोरीलाविशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत घरभेटींची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून पाहणीबेल्हे येथे ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचे उद्या उद्घाटनएसएनडीटी महिला विद्यापीठाच्या १११ व्या स्थापना दिनानिमित्त भारतरत्न महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचे राज्यपालांच्या हस्ते अनावरणतळेगाव नगर परिषदेअंतर्गत संभाजीनगर येथील पाणीपुरवठा योजनेच्या तांत्रिक चाचणीबाबतचा खुलासाशासकीय नोकरीच्या आमिषाने १५ लाखांची फसवणूक

तळेगाव नगर परिषदेअंतर्गत संभाजीनगर येथील पाणीपुरवठा योजनेच्या तांत्रिक चाचणीबाबतचा खुलासा

मुख्य बाजारपेठेतील पाईपलाईन चाचणीवेळी पाणी वर आले; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनाचे आवाहन

marathinews24.com

पुणे – तळेगाव दाभाडे शहरातील संभाजीनगर परिसरात मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर पाणी वर येणे व रस्ता खचल्याबाबत काही प्रसार माध्यमे तसेच सामाजिक माध्यमांवर विविध प्रकारच्या बातम्या प्रसारित होत आहेत. याबाबत नगर परिषदेकडून वस्तुस्थितीदर्शक खुलासा दिला आहे.

शासकीय नोकरीच्या आमिषाने १५ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरामध्ये विविध पाण्याच्या टाक्या, मुख्य दाबनलिका तसेच वितरण नलिका टाकण्याची कामे करण्यात आली आहेत. या योजनेअंतर्गत संभाजीनगर येथील नव्याने बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीच्या आउटलेट लाईनची नियोजित तांत्रिक चाचणी रविवार, दि. ४ जुलै २०२६ रोजी घेण्यात येत होती. या चाचणीवेळी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व तांत्रिक कर्मचारी, संबंधित कंत्राटदार तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

सदर मुख्य पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन सुमारे दीड वर्षापूर्वी टाकण्यात आली होती. संबंधित रस्ता हा शहरातील मुख्य बाजारपेठेतील व अत्यंत वर्दळीचा असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अंतिम चाचणीपूर्वी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते.
नियोजित चाचणी सुरू करण्यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली होती. टाकीतून पाणी सोडल्यानंतर पाण्याचा दाब अधिक असल्याने जमिनीखालून पाणी वर आले. ही बाब निदर्शनास येताच तांत्रिक पथकाने तत्काळ मुख्य व्हॉल्व बंद करून पाण्याचा प्रवाह थांबविला.

त्यानंतर संबंधित ठिकाण तातडीने मोकळे करून पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी आवश्यक मोजमाप घेण्यात आले असून, उर्वरित काम मंगळवारपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंत्राटदारामार्फत रस्ता व परिसर पूर्ववत करण्यात येईल.

त्यामुळे सदर घटना ही कोणत्याही निकृष्ट कामाची किंवा अनपेक्षित दुर्घटनेची नसून पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नियोजित तांत्रिक चाचणीदरम्यान घडलेली बाब आहे. असे तळेगाव नगर परिषदेकडून देण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×