Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

बेल्हे येथे ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचे उद्या उद्घाटन

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते दृकश्राव्य माध्यमातून होणार उद्घाटन

marathinews24.com

पुणे – आंतरराष्ट्रीय सहकार सप्ताह तसेच केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त बेल्हे (ता. जुन्नर) येथील बेल्हे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेडच्या ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचे उद्घाटन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते दृकश्राव्य माध्यमातून सोमवार, दि. ६ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे.

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या १११ व्या स्थापना दिनानिमित्त भारतरत्न महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण; ‘इनोव्हेशन महाकुंभ २.०’चे उद्घाटन – सविस्तर बातमी

सन १९१७ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे सध्या ३,६३२ सभासद असून संस्थेच्या मालकीचे बेल्हे येथील व्यापारी संकुल तसेच अद्ययावत संगणकीकृत कार्यालय कार्यरत आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने संस्थेमार्फत मध्यम मुदत, अल्पमुदत पीक कर्ज, ट्रॅक्टर, गाई-गोठा, पाइपलाइन, शेळीपालन, कुक्कुटपालन, जीप व कार यासाठी कर्जपुरवठा करण्यात आला आहे. आजअखेर संस्थेने सुमारे २७ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले असून बँक पातळीवर १०० टक्के आणि संस्था पातळीवर ९० टक्के कर्जवसुली झाली आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात संस्थेला लेखापरीक्षणात ‘अ’ वर्ग प्राप्त झाला असून सभासदांना सातत्याने १५ टक्के लाभांश देण्यात येत आहे.

केंद्र शासनाच्या जागतिक स्तरावरील धान्य गोदाम (WLGS) आणि कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) योजनेअंतर्गत संस्थेला ५०० मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम मंजूर झाले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ६५.६२ लाख रुपये खर्च अपेक्षित असून त्यापैकी ५६.८७ लाख रुपयांचे कर्ज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत मंजूर करण्यात आले आहे. या कर्जावर चार टक्के व्याजदर असून सात वर्षांत परतफेड करावयाची आहे. तसेच केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून तीन टक्के व्याज अनुदान आणि ३३ टक्के भांडवली अनुदान मंजूर असून त्यातील ५० टक्के अनुदान संस्थेच्या खात्यावर प्राप्त झाले आहे.

या प्रकल्पासाठी केंद्रीय व राज्य सहकार विभाग, राज्य सहकारी बँक, नाबार्ड, एनसीसीएफ, एमसीडीसी तसेच इतर सहकारी संस्थांचे सहकार्य लाभले आहे. या गोदामामुळे संस्थेच्या उत्पन्नात वाढ होण्यासह धान्य साठवणूक व व्यवसायाला चालना मिळणार आहे.
या उद्घाटन कार्यक्रमास खासदार डॉ. अमोल कोल्हे, महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, आमदार शरद सोनवणे, आमदार अतुल बेनके, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक ॲड. संजयराव काळे, संचालिका पूजा बुट्टे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, तालुक्यातील सहकारी संस्थांचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, सभासद, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×