Breking News
तालुका स्तरावर अन्न व औषध प्रशासनाचे संपर्क कक्ष सुरू करण्याची ओमप्रकाश यांची मागणी..मोशी कचरा डेपो दुर्घटना : पर्यावरण विभाग व अँटोनी लारा रिन्युएबल या संबंधित ठेकेदार कंपनीला नोटीस देण्याचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचे निर्देशकाळू व शाई धरणवासियांच उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंना साकडंपालखी सोहळ्यात भाविकांकडील दागिने लंपासलोकमान्यनगरमध्ये ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेमोशी कचरा डेपो दुर्घटना : ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकाचा मृत्यूऑपरेशन टायगर हे उद्धव ठाकरे यांच्या कर्माचे फलितवारकऱ्यांचा ‘चरण सेवा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसादआषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर “महिला उन्नती वारी २०२६” उपक्रमाचा ऊरळी कांचन येथे शुभारंभश्री संत सोपानकाका महाराज पालखी स्वागतासाठी माळेगाव बु. सज्ज

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकाचा मृत्यू

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकाचा मृत्यू

दुर्घटनेतील एकूण मृतांची संख्या ९ वर; शोधमोहीम पूर्ण झाल्याने बचावकार्य थांबविण्यात आले

marathinews24.com

पिंपरी – मोशी कचरा डेपो येथे झालेल्या दुर्घटनेत चौथ्या दिवशीच्या शोधमोहीमेत दुर्घटनाग्रस्त इमारतीत अडकलेल्या ७ नागरिकांच्या मृत्यूसह इमारतीशेजारील ढिगाऱ्याखाली मध्यरात्री १ वाजता आढळून आलेल्या वामन कसबे (वय ५०, मोशी) या नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या ९ इतकी झाली असून या दुर्घटनेतील सर्व नागरिकांचा शोध पूर्ण झाल्याने बचावकार्य थांबविण्यात आले आहे.

खासदार विनायक राऊत यांच्या सुनेच्या तक्रारीची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल – सविस्तर बातमी 

८ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास मोशी कचरा डेपो येथे इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून दुर्घटना घडली. या इमारतीत व इमारतीबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, भारतीय सेना, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासन तसेच इतर संबंधित यंत्रणांकडून बचावकार्य सुरू करण्यात आले. घटना घडल्यानंतर लागलीच पाच नागरिक स्वतः बाहेर आले होते. उर्वरित १८ नागरिकांपैकी ९ नागरिकांना दुर्घटनाग्रस्त इमारतीतून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. तब्बल ८४ तास अविरत चाललेल्या या बचावमोहीमेतील शोधकार्यामध्ये चौथ्या दिवशी इमारतीत अडकलेल्या ७ आणि इमारतीशेजारील ढिगाऱ्यात अडकलेल्या १ अशा ८ व्यक्तींचा मृत्यू झाला. तर इमारतीत अडकलेल्या भावेश वाणी यांचा ९ जुलै रोजी मृत्यू झाला होता. बचावकार्याच्या चौथ्या दिवशी अक्षय सावंत (वय ३५, मोशी), सुनील कोरके (वय ४०, आळंदी), सन्नी माने (वय ३९, गंधर्वनगरी, मोशी), महेश कुंभार (वय ३३, छत्रपती संभाजीनगर), नागेश गायकवाड (वय २६, संजय गांधी नगर, मोशी), रणजीत पाटील (वय २२, मोशी) तसेच राहुल गायकवाड (वय ३४, मोशी) यांचा मृत्यू झाला.

एक नागरिक इमारतीशेजारील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकून पडल्याने त्याठिकाणी निरंतर शोधमोहीम सुरू होती. अखेर चौथ्या दिवशी मध्यरात्री १ वाजता वामन कसबे (वय ५०, मोशी) यांचा शोध लागला. त्यांना तातडीने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तपासणीअंती त्यांना मृत घोषित करण्यात आले.

संपूर्ण बचावकार्यादरम्यान आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून होते. दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये सुरक्षित प्रवेश करण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. अशा परिस्थितीत इमारतीच्या बाजूचा कचऱ्याचा ढीग वेगाने हटविल्यानंतर या इमारतीत प्रवेश करण्याचे सर्व बाजूंनी प्रयत्न करण्यात आले. इमारत अस्थिर असल्याने ती पूर्ण कोसळून आत अडकलेल्या जीवितांना धोका पोहोचू नये, याची काळजी घेऊन बचावकार्य राबविण्यात येत होते. इमारतीचा वरचा मजला हटविण्यासाठी दोन अत्याधुनिक डिमोलिशन एक्सकॅव्हेटर यंत्रे मागविण्यात आली. या यंत्रांच्या सहाय्याने इमारतीच्या वरच्या मजल्याचे काँक्रीट फोडून आत जाण्याचा मार्ग तयार करण्यात आला.

चौथ्या दिवशी दुपारी २ वाजता इमारतीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात झाली. रात्री १० वाजेपर्यंत अडकलेल्या सर्व आठही नागरिकांना बाहेर काढून तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालय प्रशासनाने या सर्वांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान, इमारतीशेजारील ढिगाऱ्यात अडकलेल्या नागरिकाचा शोध घेण्यासाठी सर्चिंग ऑपरेशन निरंतर सुरू होते. यासाठी एनडीआरएफच्या श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली. अखेर मध्यरात्री १ वाजता वामन कसबे यांचा शोध लागला. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालय प्रशासनाने त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील एकूण मृतांची संख्या ९ इतकी झाली आहे. या दुर्घटनेत अडकलेल्या सर्व नागरिकांचे शोधकार्य पूर्ण झाल्याने अखंडपणे तब्बल ८४ तास चाललेली ही बचावमोहीम मध्यरात्री २ वाजता थांबविण्यात आली.

मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या अत्यंत दुर्दैवी दुर्घटनेत भावेश वाणी, अक्षय सावंत, सुनील कोरके, रणजीत पाटील, सन्नी माने, महेश कुंभार, नागेश गायकवाड, राहुल गायकवाड, वामन कसबे यांना आपला अमूल्य जीव गमवावा लागला. ही घटना मनाला अक्षरशः सुन्न करणारी आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी अत्यंत वेदनादायी आहे.

मलब्याखाली अडकलेल्या प्रत्येक सहकाऱ्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, भारतीय सेनेचे जवान, पोलीस प्रशासन तसेच सर्व संबंधित विभागांनी रात्रंदिवस अथक परिश्रम घेतले. जीवाची बाजी लावत प्रत्येक जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, अखेर नियतीपुढे सारे प्रयत्न अपुरे ठरले. आज महापौर म्हणून नव्हे, तर एका सहकाऱ्याच्या आणि माणुसकीच्या नात्याने माझे मन अत्यंत व्यथित झाले आहे. आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी जीव गमावलेल्या या सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेले दुःख शब्दांत व्यक्त करता येत नाही. हा अत्यंत वेदनादायी प्रसंग असून दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.

– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

मोशी कचरा डेपो येथे घडलेली घटना दुर्दैवी असून यामध्ये ९ नागरिकांचा मृत्यू झाला. मनाला प्रचंड वेदना देणारी ही घटना आहे. यंत्रणांनी तब्बल ८४ तास सलग बचाव मोहीम राबविली. ९ नागरिकांना सुखरुप बाहेर देखील काढले. मात्र ९ नागरिकांचा झालेला अंत मन हेलावून टाकणारा आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत असून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×