Breking News
तालुका स्तरावर अन्न व औषध प्रशासनाचे संपर्क कक्ष सुरू करण्याची ओमप्रकाश यांची मागणी..मोशी कचरा डेपो दुर्घटना : पर्यावरण विभाग व अँटोनी लारा रिन्युएबल या संबंधित ठेकेदार कंपनीला नोटीस देण्याचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचे निर्देशकाळू व शाई धरणवासियांच उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंना साकडंपालखी सोहळ्यात भाविकांकडील दागिने लंपासलोकमान्यनगरमध्ये ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेमोशी कचरा डेपो दुर्घटना : ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकाचा मृत्यूऑपरेशन टायगर हे उद्धव ठाकरे यांच्या कर्माचे फलितवारकऱ्यांचा ‘चरण सेवा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसादआषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर “महिला उन्नती वारी २०२६” उपक्रमाचा ऊरळी कांचन येथे शुभारंभश्री संत सोपानकाका महाराज पालखी स्वागतासाठी माळेगाव बु. सज्ज

लोकमान्यनगरमध्ये ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

लोकमान्यनगरमध्ये ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील १ लाख ८० हजार रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनकवडीतील उड्डाणपुलाजवळ एकाचा खून – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७० वर्षीय महिला सिंहगड रस्ता भागात राहायला आहेत. त्या १० जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास लोकमान्यनगर परिसरातून निघाल्या होत्या. त्या वेळी त्यांच्या मागावर असलेल्या एका चोरट्याने गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला. चोरटा पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी लोकमान्यनगर परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक कारके तपास करत आहेत.

भरदिवसा फ्लॅटमधून ऐवज चोरी

पुणे- फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी कपाटातील एक लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ५० वर्षीय महिला नऱ्हे भागातील श्री समर्थ सोसायटीत राहायला आहेत. ९ जुलै रोजी सकाळी त्यांच्या सदनिकेचा दरवाजा उघडा होता. महिलेेचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी कपाटातून एक लाख ३९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. कपाटातून ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस कर्मचारी खटावकर तपास करत आहेत.

शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून ऐवज चोरून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. हडपसर, बिबवेवाडी भागातील सोसायटीतील सदनिकेतून ऐवज चोरून नेण्याची घटना नुकतीच घडली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×