Breking News
तालुका स्तरावर अन्न व औषध प्रशासनाचे संपर्क कक्ष सुरू करण्याची ओमप्रकाश यांची मागणी..मोशी कचरा डेपो दुर्घटना : पर्यावरण विभाग व अँटोनी लारा रिन्युएबल या संबंधित ठेकेदार कंपनीला नोटीस देण्याचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचे निर्देशकाळू व शाई धरणवासियांच उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंना साकडंपालखी सोहळ्यात भाविकांकडील दागिने लंपासलोकमान्यनगरमध्ये ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेमोशी कचरा डेपो दुर्घटना : ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकाचा मृत्यूऑपरेशन टायगर हे उद्धव ठाकरे यांच्या कर्माचे फलितवारकऱ्यांचा ‘चरण सेवा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसादआषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर “महिला उन्नती वारी २०२६” उपक्रमाचा ऊरळी कांचन येथे शुभारंभश्री संत सोपानकाका महाराज पालखी स्वागतासाठी माळेगाव बु. सज्ज

मोशी कचरा डेपो दुर्घटना : पर्यावरण विभाग व अँटोनी लारा रिन्युएबल या संबंधित ठेकेदार कंपनीला नोटीस देण्याचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचे निर्देश

मोशी कचरा डेपो दुर्घटना : पर्यावरण विभाग व अँटोनी लारा रिन्युएबल या संबंधित ठेकेदार कंपनीला नोटीस देण्याचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचे निर्देश

दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश; जबाबदारी निश्चित करण्यासाठी तातडीने कारवाई सुरू

marathinews24.com

पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज मोशी कचरा डेपो दुर्घटनेसंदर्भात महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मोशी कचरा डेपो दुर्घटनेसंदर्भात महापालिकेचा पर्यावरण विभाग तसेच अँटोनी लारा रिन्युएबल या संबंधित ठेकेदार कंपनीला नोटीस देण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.

काळू व शाई धरणवासियांच उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंना साकडं – सविस्तर बातमी 

बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कचऱ्याचा ढीग ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळून गंभीर दुर्घटना घडली. या इमारतीत २२ तर इमारतीशेजारी असलेल्या कचऱ्याच्या ढिगाखाली १ असे एकूण २३ नागरिक अडकले होते. या पैकी इमारतीतून पाच नागरिक सुखरुप बाहेर पडले. उर्वरित अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारतीय सेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासन यांनी बचावकार्य सुरू केले. यामध्ये इमारतीत अडकलेल्या ९ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात बचावपथकाला यश आले. तर या घटनेत इमारतीत अडकलेल्या ९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी या घटनेच्या सखोल चौकशी आदेश दिले आहेत. या संदर्भात आयुक्त डॉ.सूर्यवंशी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत तात्काळ महापालिकेचा पर्यावरण विभाग व संबंधित ठेकेदार कंपनी यांना नोटीस देण्याचे निर्देश दिले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×