Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

नामवंत कंपनीच्या नावे बनावट मीठाची विक्री

नामवंत कंपनीच्या नावे बनावट मीठाची विक्री

व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – नामवंत कंपनीच्या नावे बनावट मीठ विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल करण्यात आला आहे.हडपसर-फुरसुंगी भागातील एका गोदामात नामवंत उत्पादकाच्या नावे बनावट मीठाच्या पुड्यांचा साठा करुन ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी व्यावासयिकाविरुद्ध काॅपीराईट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कृष्णा देवीप्रसाद कनोजिया (वय ५०, कुरार व्हिलेज, मालाड, मुंबई) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रिक्षा प्रवासी महिलेकडील साडेतीन लाखांचे दागिने चोरी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर-सासवड रस्त्यावर फुरसुंगी भागात आरंभ डिस्ट्रीब्युटर्स या गोदामात नामवंत मीठ उत्पादकाच्या नावे बनावट मीठाच्या पुड्यांचा साठा करुन ठेवण्यात आल्याची माहिती काॅपीराईट कंपनीतील अधिकारी कनोजिया यांना मिळाली होती. त्यांनी याबाबतची माहिती फुरसुंगी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला. पोलिसांनी या प्रकरणी मार्केट यार्डातील एका व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत.

बनावट ओैषधांची विक्री; ओैषध विक्रेत्यासह ८ जणांविरुद्ध गुन्हा

सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक भागातील ओैषध विक्री दुकानातून बनावट ओैषधी गोळ्यांची विक्री होत असल्याचा प्रकार अन्न आणि ओैषध प्रशासन विभागाने (एफडीए) उघडकीस आणला. याबाबत एफडीएतील निरीश्रक श्रृतिका जाधव यांनी नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सात्विक फार्मा शाॅप या ओैषध विक्री दुकानाच्या मालकासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिक्कीमधील सनफार्मा लॅबोरटरीज या ओैषध निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून लेबीपील या गोळ्यांची निर्मिती केली जाते. ओैषध विक्री दुकानाच्या मालकाने या कंपनीच्या नावे बनावट गोळ्यांची विक्री केल्याचा प्रकार एफडीएने केलेल्या कारवाईत उघड झाला. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×