Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

रिक्षा प्रवासी महिलेकडील साडेतीन लाखांचे दागिने चोरी

रिक्षा प्रवासी महिलेकडील साडेतीन लाखांचे दागिने चोरी

रिक्षातून प्रवास करणाऱ्या चार सहप्रवासी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – रिक्षा प्रवासी महिलेच्या पिशवीतून तीन लाख ६८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविण्यात आल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर घडली. याबाबत एका महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रिक्षातून प्रवास करणाऱ्या चार सहप्रवासी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इमारतीतून तोल जाऊन पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ५१ वर्षीय महिला मूळच्या धाराशिव जिल्ह्यातील सोनेगावच्या रहिवासी आहेत. त्या १२ जुलै रोजी हडपसर गाडीतळ ते लोणी काळभोर दरम्यान सहा आसनी रिक्षाने प्रवास करत होत्या. रिक्षात त्यांच्या शेजारी चार महिला प्रवासी होत्या. प्रवासादरम्यान महिलेच्या पिशवीतून तीन लाख ६८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविण्यात आले. सहप्रवासी महिलांनी दागिने चोरी केल्याचा संशय महिलेने फिर्यादीत व्यक्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के तपास करत आहेत.

पादचारी तरुणाचा मोबाइल हिसकावला

पादचारी तरुणाचा मोबाइल दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना विमाननगर भागात घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हा विमाननगर भागातील एका सोसायटीत राहायला आहे. तो १३ जुलै रोजी सकाळी फिरायला निघाला होता. दुचाकीस्वार चोरट्याने त्याच्या हातातील ७० हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून नेला. पोलीस हवालदार मांजरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×