Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

इमारतीतून तोल जाऊन पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू

Construction worker death

ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – नियोजित गृहप्रकल्पातून तोल जाऊन पडल्याने बांधकाम मजूर तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना वाघोली परिसरात घडली.
प्रेमचंद लजार मरांडी (वय १८, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. याबाबत प्रेमचंद याचा भाऊ हरीदास (वय २२) याने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, बांधकाम ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात कुख्यात गुंड टोळीचा व्यावसायिकावर कोयत्याने खुनी हल्ला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली परिसरात शांतीवन होम्स परिसात नियोजित गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. १३ जुलै रोजी दुपारी प्रेमचंद हा नियोजित गृहप्रकल्पात काम करत होता. त्या वेळी तोल जाऊन पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. गृहप्रकल्पात बांधकाम मजुराच्या सुरक्षेविषयी पुरेशी काळजी घेतली नव्हती. तेथे संरक्षक जाळी बसविण्यात आली नव्हती. दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक रेश्मा इंगळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×