Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

Pune Crime News : पुण्यात कुख्यात गुंड टोळीचा व्यावसायिकावर कोयत्याने खुनी हल्ला

 pune crime news

फिल्मी स्टाईल मुळशी पॅटर्न प्रमाणे टोळक्याने व्यावसायिकावर केले वार

marathinews24.com

पुणे : Pune Crime News – कुख्यात गुंड टोळीच्या कोयताधारी साथीदारांनी कोथरुड परिसरात राडा घातला. मध्यवर्ती भागात कोयता गॅंगने तरुण व्यावसायिकावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.१४) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोकण हॉटेलसमोर घडली आहे. ८ ते १० जणांच्या टोळक्याने तरुणाच्या डोक्यात कोयत्याने दोन वर्मी घाव घातले आहे. त्यामुळे ते गंभीरपणे जखमी झाले आहेत. फिल्मी स्टाईल मुळशी पॅटर्न प्रमाणे धावपळ करत टोळक्याने व्यावसायिकावर वार केल्याने खळबळ उडाली आहे. घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे.

मोटारीची काच फोडून रोकड चोरी; परप्रांतीय चोरट्यांची टोळी गजाआड – सविस्तर बातमी 

अमित सुरेश शिंदे (वय ३५, रा. कोथरुड ) असे गंभीर जखमी झालेल्या व्यावसायिक तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपासाला गती दिली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, फिल्मी स्टाईल कोयता हल्ल्यात अमित शिंदे हा तरुण गंभीरपणे जखमी झाला आहे. दरम्यान, परिसरात असलेल्या कुख्यात टोळी प्रमुखाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यामुळे संबंधित टोळीशी निगडित असलेल्या साथीदारांनी तरुणाला भर रस्त्यात कोकण हॉटेलजवळ गाठले.

बनावट कागदपत्रे देऊन सिमकार्ड खरेदी केल्याप्रकरणी संबंधित मोबाईल शॉपी व्यावसायिक शिंदे यांनी कुख्यात गुंडविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्याचा राग टोळीला असल्याने मंगळवारी रात्री सातच्या सुमारास शिंदे हे कोकण हॉटेल परिसरात असलेल्या शॉपीमध्ये असताना त्यांना अडवले. टोळक्याने त्यांना मारहाण केल्यानंतर शर्टमध्ये लपवलेले कोयते बाहेर काढून थेट हल्ला चढवला. ८ ते १० जणांनी फिल्मी स्टाईल धावाधाव करून व्यावसायिक शिंदे यांच्यावर कोयत्याचे दोन वार केले. हे वार अमितच्या डोक्यात लागले असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पुणे पोलिसांच्या कामगिरीवर पुन्हा प्रश्नचिन्ह

शहरात सलग खून, खुनाचा प्रयत्न, महिला छेडछाड घटनांचे प्रकार वाढल्यामुळे काही दिवसांपुर्वी पुणे पोलिसांनी हॉटेल व्यावसायिक, बेकायदा होकर्स, पान विक्रेत्याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला होता. त्यामुळे रात्रभर जागे असणारे पुणे ११ वाजता शांत होत होते. मात्र, नव्या संकल्पनेला स्थानिक पोलिसासह गुन्हे शाखेने फार दिवस अंगिकारले नाही. काही दिवसांपासून संबंधित सर्व आस्थापना पुन्हा नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून आले आहे त्यातच दिवस मावळतीला व्यावसायिकावर हल्ला झाल्या मुळे पोलिसांच्या कामगिरीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×