Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

मोटारीची काच फोडून रोकड चोरी; परप्रांतीय चोरट्यांची टोळी गजाआड

मोटारीची काच फोडून रोकड चोरी; परप्रांतीय चोरट्यांची टोळी गजाआड

विमानतळ पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – मोटारीची काच फोडून रोकड चोरणाऱ्या तामिळनाडूतील चोरट्यांच्या टोळीला विमानतळ पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून ५० हजार रुपये, केसांचे चाप, तसेच छर्रे असा मुद्देमाल जप्त केला. राजा आरमुग्गम (वय ४७, रा. गांधीनगर, त्रिचरापल्ली, तामिळनाडू), लक्ष्मणन एस. संथाकुमार (वय ४०, रा. पुंगनुर, श्रीरंगम, तामिळनाडू), मुथ्थूलिंगम परमानंद लिंगम (वय ४०, रा. पेरंबुर, तंजावर, तामिळनाडू) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पाकिस्तानातील गुंड शहजाद भट्टीच्या संपर्कातील ६६ जणांची चौकशी – सविस्तर बातमी 

पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील एका माॅलसमोर परदेशी बनावटीच्या महागड्या मोटारीची काच फोडून चोरट्यांनी पिशवी, मोबाइल संच, रोकड चोरुन नेल्याची घटना ४ जुलै रोजी घडली होती. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. चित्रीकरणात संशयित चोरटे दिसून आले होते. खराडी बाह्यवळण मार्गावर चोरटे थांबल्याची माहिती खबऱ्याने तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांना दिली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून तिघांना पकडले. त्यांच्याकडून केस बांधण्यासाठी महिला वापरत असलेले चाप, रोकड, छर्रे असा मुद्देमाल जप्त केला. चोरट्यांनी येरवडा, खराडी, तसेच लातूर परिसरात मोटारीची काच फोडून रोकड, तसेच मुद्देमाल चोरुन नेण्याचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार, सहायक आयुक्त सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक महेश बोलके, उपनिरीक्षक नितीन राठोड, दिलीप पालवे, योगेश थोपटे, राहुल जोशी, हरिप्रसाद पुंडे, प्रशांत सुतार, रुपेश पिसाळ, लालू कुऱ्हे, सचिन मांजरे, अंबादास चव्हाण यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×